मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, एकनाथ शिंदे यांचा थेट निर्णय, सर्व नगरसेवकांना…
BMC Mahapalika Election Results 2026 : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून मुंबईत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली. मात्र, यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला.

राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापाैर होईल. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले. मात्र, म्हणावी तशी कमाल करण्यात अपयश मिळाले. भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष महापालिका निवडणुकीत ठरला. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र लढवली आणि धमाल केली. मुंबई महापालिकेत भाजपाचे एकून 89 उमेदवार निवडून आले तर शिवसेना शिंदे गटाचे 29 उमेदवार निवडून आले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या युतीने मुंबई महापालिकेत धमाका नक्कीच केला. अजित पवारांनी अनेक महापालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत काका शरद पवार यांना साथ दिली आणि निवडणूक लढवली. मात्र, यामध्ये अजित पवार गटाला मोठा फटका बसला आणि पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय जनता पक्षाचा महापाैर होण्याचे संकेत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आता हॉटेलमध्ये राहणार आहेत. सर्व विजयी उमदेवारांचा मुक्काम पुढील 3 दिवस हॉटेलमध्ये असेल
Municipal Election 2026
देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकेत चमत्कार घडवला
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
AIMIM BMC Election 2026 : BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की उद्धव ठाकरेंना? असदुद्दीन ओवैसींनी काय उत्तर दिलं?
Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
यादरम्यान नगरसेवकांना एकनाथ शिंदेंसोबतच सर्व प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये, यामुळे एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. बांद्राच्या ताज लॅन्डमध्ये सर्व नगरसेवकांना ठेवण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांचे सर्व नगरसेवक पुढील 3 दिवस याच हॉटेलमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
फक्त हेच नाही तर कडक सुरक्षेत नगरसेवकांना ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना अशाप्रकारे हॉटेलमध्ये एकत्र आणि कडक सुरक्षेत ठेवल्यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर आपले नगरसेवक फुटले जाणार नाहीत, याची विशेष काळजी देखील शिंदेंकडून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
