AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुन्हा भूकंप? दोन कट्टर राजकीय विरोधकांची जेवणाच्या टेबलवर दिलजमाई? शरद पवारांना बसणार ‘जोर का झटका’!

मोठी बातमी समोर येत आहे, जळगावमध्ये दोन कट्टर राजकीय विरोधकांची जेवणाच्या टेबलवर दिलजमाई झाल्याचं पहायला मिळत आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पुन्हा भूकंप? दोन कट्टर राजकीय विरोधकांची जेवणाच्या टेबलवर दिलजमाई? शरद पवारांना बसणार 'जोर का झटका'!
Image Credit source: Facebook
| Updated on: Jan 27, 2025 | 2:46 PM
Share

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी एकत्र जेवण केलं आहे.  जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील व आमदार एकनाथ खडसे यांचा एकत्र जेवण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आज पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे,  या बैठकीपूर्वी एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्र जेवण केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात या जेवणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एकमेकांवर सतत टीका करणारे दोन कट्टर राजकीय विरोधक यानिमित्तानं एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान दुसरीकडे मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होताच एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. मी अनेकदा तक्रारी केल्या मात्र मला उत्तरच आलं नाही. वर्षभरात मी तब्बल 25 स्मरणपत्र प्रशासनाला दिली मात्र एकाही पत्राचं उत्तर मला आलं नाही. शासनाचं काम  म्हणजे वांझोटेपणाचा कळस आहे, असं यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  आमदारांना उत्तर देण्याचे शासनाचे आदेश आहेत, त्यानुसार किमान दोन ओळीत तरी उत्तर द्यावं, मात्र 25 -25 स्मरणपत्रं देऊन सुद्धा उत्तर येत  नाही.  आमदारांनी 25 स्मरणपत्रं द्यायची एकालाही उत्तर नाही, कसले हे गतीमान सरकार आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे.  पहिली ते सातवीचा वर्ग झाडाखाली बसतो या प्रगत जिल्ह्यामध्ये विद्यार्थी झाडाखाली बसणं ही गोष्ट काही चांगली नाही, अस म्हणत एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी पासूनच एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे हे देखील इच्छूक आहेत, मात्र त्यांच्या प्रवेशाला काही मुहूर्त लागलेला नाही. त्यातच आता गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे हे एकत्र दिसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार यांना आणखी एक धक्का बसणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?