AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हायरल ऑडिओ, सूनेबद्दल आक्षेपार्ह शब्द, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

eknath khadse : एकनाथ खडसे यांनी विजय चौधरींच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी चौधरींवर कारवाईची मागणी केली.

व्हायरल ऑडिओ, सूनेबद्दल आक्षेपार्ह शब्द, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jul 30, 2026 | 10:16 AM
Share

नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे समोर आलं आहे. यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी ऑडिओ क्लिप ऐकली आहे. नवीन भाजप आणि जुनी भाजपमध्ये संस्कृतीचा फरक आहे. चौधरीसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा खराब होते. विजय चौधरी हे गेल्या 25-30 वर्षांत दारुच्या धंद्यात आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील दारूमाफीया म्हणून यांचं कुटुंब ओळखलं जातं. पैसे खर्च करावे, यासाठी त्यांना भाजपने सरचिटणीस केलं. अशा स्वरुपाचं वर्तवणूक, विचार करण्याची प्रवृत्ती आहे. एकाच घरात दोन पक्ष आहेत. नारायण राणे यांचं उदाहरण देता येईल. ते काँग्रेसमध्ये होते. त्यांचा एक मुलगा भाजपमध्ये आहे. तर एक शिवसेनेत आहे.

‘भाजप स्वतंत्र पक्ष आहे. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. चौधरी यांनी असभ्य आणि अश्लाघ्य शब्द महिलांविषयी वापरले आहेत. ही भाजपची संस्कृती आहे का? महिलांबाबत घाणेरडे शब्द वापरले आहेत. माझ्या तोंडून शब्द येणार नाही, असे शब्द वापरले आहेत. रक्षा खडसे, कल्पना पांडे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे दिसून येते. त्यांनी राजीनामा दिला, हे बरे केले. असे अनेक लोक भाजपमध्ये आहेत. वर्षानुवर्षे काम केलेला माणूस आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. अनेक पदांवर काम केलं आहे. नवी माणसं न आवरणारी आहेत. यामुळे भाजपची प्रतिमा वाईट होत आहे. भाजपने त्यांची चिंता करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आताच्या भाजपवर टीका करताना खडसे म्हणाले की, ‘आताची भाजप आणि आधीची भाजपमध्ये फरक आहे. आताचे मंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. एखाद्या मंत्र्याने ताबडतोब थांबवलं असतं. पण मंत्र्याने थांबवलं नाही, शांतपणे ऐकून घेतलं. महिलांविषयी घाणेरडे शब्द वापरले, त्यांना रोखायला हवं होतं’. रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली, त्यावर बोलताना खडसे म्हणाले, ‘फक्त सूनेविषयी घाणेरडे शब्द वापरले नाहीत. तर नंदुरबारमधील स्थानिक महिलांसोबतही असभ्य वर्तन केलं आहे. मी ही क्लिप भाजपच्या वरिष्ठांकडे देणार आहे. माझेही भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांना ही बाब कळवणार आहे. अशी घटना घडत असेल, तर हे दुर्दैव आहे’.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू