AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना दिला आहे, ठाकरे गटाचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
| Updated on: Mar 06, 2025 | 8:54 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं  जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात तब्बल 232 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवरच समाधान मानावलं लागलं. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे, महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसला आहे, तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर पक्षात होणारे पक्षप्रवेश हे ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत. आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दोन बडे नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

माजी मंत्री उत्तम खंदारे, माजी आमदार शिवरन पाटील, दोन जिल्हाप्रमुख आणि एक सहसंपर्कप्रमुख आज ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे.  उत्तम खंदारे आणि शिवरन पाटील यांच्यासोबतच बुलढाणा, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते संजय जाधव, भावना गवळी आणि आमशा पाडवी यांची देखील उपस्थिती असणार आहे.

ठाकरेंना मोठा धक्का 

दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.