मुंबई विमानतळाजवळील फनेल झोन मधील इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग प्रशस्त होणार, नगरविकास मंत्री सकारात्मक

ठाणे : मुंबई विमानतळ रनवेच्या फनेल झोनमुळे बाधित होणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा (Redevelopment) मार्ग लवकरच प्रशस्त होणार आहे. कारण या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्याचा नगरविकास विभाग (Urban Development Department) त्यांच्या पुनर्विकासाचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार आहे. आज याबाबत व्हीसीद्वारे पार पडलेल्या बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबतचे निर्देश दिले. […]

मुंबई विमानतळाजवळील फनेल झोन मधील इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग प्रशस्त होणार, नगरविकास मंत्री सकारात्मक
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 11:42 PM

ठाणे : मुंबई विमानतळ रनवेच्या फनेल झोनमुळे बाधित होणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा (Redevelopment) मार्ग लवकरच प्रशस्त होणार आहे. कारण या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्याचा नगरविकास विभाग (Urban Development Department) त्यांच्या पुनर्विकासाचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार आहे. आज याबाबत व्हीसीद्वारे पार पडलेल्या बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबतचे निर्देश दिले.

मुंबई विमानतळ रनवे फनेलमुळे पुनर्विकासापासून वंचित राहिलेल्या इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. या इमारतींची उंची वाढवायला तसेच इतर इमारतींप्रमाणे त्यांना एफएसआय आणि टीडीआरचे लाभ घेता येत नसल्याने त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या इमारतींचा पुनर्विकास करणे व्यवहारिक नसल्याचे कारण पुढे करून अनेक विकासकानी त्यांच्याकडे पाठ फिरवलीय. मुंबईतील घाटकोपर, कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले येथील अंदाजे 15 ते 20 लाख लोक या इमारतीमध्ये रहात आहेत. त्यातील अनेक इमारती 60 ते 70 वर्ष जुन्या झाल्याने अत्यंत धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत. त्यात अनेक नागरिक आपला जीव मुठीत धरून जगत आहेत. या इमारतींना दिलासा देण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित करण्याची मागणी होऊ लागली होती.

किती टीडीआर मिळणार?

याबाबत आज पार पडलेल्या बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, युवासेना सचिव आणि विले पार्लेचे रहिवासी वरुण सरदेसाई, आमदार संजय पोतनीस, मंगेश कुडाळकर, पराग आळवणी, भाई जगताप यांनी नागरिकांच्या समस्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडल्या. तसेच या इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित करताना सर्वसामान्य इमारतींना अधिकृत बिल्ट अप एरियाच्या आधारावर टीडीआर द्यावा आणि महापालिकेच्या रेकॉर्ड मध्ये आहेत तेवढ्याच सदनिका बांधण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली. हे शक्य नसल्यास सर्वसामान्य इमारतींना मिळतो तोच टीडीआर या इमारतींना देऊन विकासकांना पुनर्विकास व्यवहारिक होईल असे सूत्र तयार करावे अशी मागणी पुढे आली.

फनेल झोन बाहेरच्या इमारतींना मिळणारे फायदे देण्याचा विचार

त्यावर फनेल झोन बाहेरच्या इमारतींना मिळणारे फायदे या इमारतींना देऊन त्यांचा पुनर्विकास व्यवहार्य बनवणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच अनेक वर्षे हे रहिवाशी पुनर्विकासापासून वंचित असल्याने त्यांना दिलासा देणं ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे याबाबत सर्वंकष धोरण तयार करून लवकरात लवकर आपल्यासमोर सादर करावे अशी सूचना त्यांनी नगरविकास विभागाला केली. तसेच या इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित झाल्यानंतर निर्णयात सुस्पष्टता रहावी यासाठी नगरविकास आणि मुंबई महानगरपालिका यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत दोन ते तीन पर्याय पुढे

मुंबई महानगरपालिकेकडून नगरविकास विभागाला याबाबत सविस्तर अहवाल मिळाला असून, या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत दोन ते तीन पर्याय पुढे आले असल्याचे नगरविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यात म्हाडाच्या पुनर्वसन सूत्रानुसार या इमारतींना 33(7) चे फायदे कसे मिळवून देता येऊ शकतील याचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अखेर याबाबतचे सर्वंकष धोरण तयार करून ते लवकरच सादर करू असे नगरविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार पराग आळवणी, आमदार आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, वास्तू रचनाकार श्रीकृष्ण शेवडे आणि विलेपार्लेचे रहिवासी तुषार श्रोत्री आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या :

Video : मुंबईत शिवसेना-भाजप नगरसेवक आमनेसामने! यशवंत जाधवांना भाजप नगरसेवकांनी घेरलं

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा

Non Stop LIVE Update
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.