AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोण वरचढ ?, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे; मोठा खुलासा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे अनेक गरजूंना मदत मिळत असते. त्यामुळे हा निधी गोरगरीबांच्या कल्याणासाठी वापरला जातो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वाढ करण्याचा प्रयत्न प्रत्येक मुख्यमंत्री करीत असतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची आकडेवारी समोर आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोण वरचढ ?, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे; मोठा खुलासा
CM Eknath Shind-Uddhav thackeray
| Updated on: Nov 13, 2023 | 12:50 PM
Share

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे अनेक गरजूंना मदत करण्यात येत असते. या मु्ख्यमंत्री सहाय्यता निधीत राज्याचा प्रत्येक मुख्यमंत्री सढळहस्ते मदत करीत असतो. मात्र आरटीआयमार्फत काढलेल्या माहीतीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणगी जमा करण्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात अखडता घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत आजी मुख्यमंत्री यांनी कमी निधी जमा केल्याची माहीती उघडकीस आली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत चांगलाच निधी जमा केल्याचा खुलासा झाला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अनेक गरजूंना मदत केली जात असते. नैसर्गिक संकट असो वा वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी नेहमीच कामाला येत असतो. मुख्यमंत्री सचिवालयाकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी संबंधी माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांना ही माहीती कळविली. त्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी केवळ 65.88 कोटी जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम गेल्या 3 मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत कमी आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांनी माहीती दिली. त्यानूसार 1 एप्रिल 2022 रोजीची शिल्लक रु 418.88 कोटी आणि 31मार्च 2023 रोजी शिल्लक रु 445 .22 कोटी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्षनिहाय प्राप्त देणग्याची माहिती 1 जानेवारी 2015 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर सर्वांत पिछाडीवर शिंदे आहेत.

निधीत सर्वाधिक देणगी ठाकरे यांची

मुख्यमंत्री असताना 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी 614 कोटींची वाढ केली तर 2 वर्षात उद्धव ठाकरे यांनी 793 कोटींची वाढ केली आहे. एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या एक वर्षात 65.88 कोटींची वाढ केली आहे.

गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल

मागील 8 वर्षात तिनही मुख्यमंत्र्यांमध्ये गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस अव्वल आहेत. फडणवीस यांच्या कार्यकाळात 1 लाख 7 हजार 782 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 63 हजार 573 नागरिकांना 598.32 कोटींची मदत करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी 10 हजार 712 पैकी 4 हजार 247 नागरिकांना 20.28 कोटी रुपयांची मदत केली तर एकनाथ शिंदे यांनी 14 हजार 566 पैकी 7419 नागरिकांना 57 कोटींची मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात हुशार आणि जबाबदार सनदी अधिका-यांची नेमणूक केल्यास निधीत वाढ होईल आणि पारदर्शकता राहील. लाभार्थीची यादी संपूर्ण तपशीलवार दिल्यास काही प्रमाणात होणारी बोगसगिरी थांबेल असे अनिल गलगली यांनी म्हटले आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.