AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : शिंदे गटाला जबर धक्का, दोन नेत्यांचा अचानक राजीनामा, मोठी माहिती समोर!

एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील धाराशीव जिल्ह्यातील दोन स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Shivsena : शिंदे गटाला जबर धक्का, दोन नेत्यांचा अचानक राजीनामा, मोठी माहिती समोर!
shivsena Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2026 | 6:55 PM
Share

Eknath Shinde Leades Join Karuna Munde Party : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका झालेल्या असल्या तरीही स्थानिक पातळीवरील नेते मंडळी आपल्या सोईनुसार पक्षप्रवेश करत आहेत. या निवडणुकांदरम्यान अनेक स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी सोईच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक जिंकलेली देखील आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

नेमका कोणी प्रवेश केला?

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील नाभिक सेनेचे खजिनदार अनिल शिंदे आणि मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब समुद्रे यांनी स्वराज्य शक्ती सेनामध्ये पक्ष प्रवेश केला. दोघांचा पक्षप्रवेश स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या हस्ते झाला.

करुणा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

या पक्षप्रवेशानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की शिवसेना शिंदे गटात त्या दोघांनाही न्याय मिळत नव्हता. त्यांना त्यांच्या नेत्याला भेटता येत नव्हते. त्यामुळे संतप्त होऊन ते आज आमच्या पक्षात सामील झाले आहेत.

करुणा मुंडे यांचा पक्ष कधीपासून सक्रिय आहे?

दरम्यान, करुणा मुंडे यांचा स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली होती. या पक्षाचे कार्यालय मुंबईतील सांताक्रुझ येथे आहे. या पक्षाचे एक कार्यालय बीड जिल्ह्यातही आहे. करुणा मुंडे यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी आणि बिड या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परळीतून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मात्र त्यांना मोजकीच मतं मिळाली होती. दरम्यान, आता धाराशीव जिल्ह्यातील दोन स्थानिक नेत्यांनी करुणा मुंडे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पक्षाला विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र