AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उड्डाण घेताच आम्ही प्रचंड घाबरलो पण एकनाथ शिंदे.., हेलिकॉप्टरमध्ये काय घडलं? चंद्रहार पाटलांनी सांगितला तो थरारक किस्सा

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, शिवसेनेच्या वतीनं जम्मू इथल्या एम्स रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, याच दरम्यान हा किस्सा घडला आहे.

उड्डाण घेताच आम्ही प्रचंड घाबरलो पण एकनाथ शिंदे.., हेलिकॉप्टरमध्ये काय घडलं? चंद्रहार पाटलांनी सांगितला तो थरारक किस्सा
| Updated on: Aug 10, 2025 | 8:48 PM
Share

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, शिवसेनेच्या वतीनं जम्मू इथल्या एम्स रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, दरम्यान जम्मूमधील एम्स रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी एकनाथ शिंदे निघाले असताना अचानक हवामान खराब झालं. हवामान खराब झाल्यामुळे आर्मीच्या पायलटनं एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरने उड्डाण न करण्याचा सल्ला दिला, मात्र त्यावेळी जे घडलं त्याचा किस्सा  चंद्रहार पाटील यांनी सांगितला आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रहार पाटील? 

एअरफोर्स पायलटनं हवामान खराब झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुढे जाऊ नका, असा सल्ला दिला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी पायलटचं न ऐकता महारक्तदान कार्यक्रमाला पोहचायचं म्हणत पायलटला हेलिकॉप्टर उडवायला सांगितलं.

त्यावेळी त्या हेलिकॉप्टरचा पायलट शिंदेंना म्हणत होता, साहेब बसू नका. त्यावेळी साहेब त्याला बोलताना म्हणाले की, वर गेल्यानंतर ठरवू. हेलिकॉप्टरनं उड्डाण करताच आम्ही प्रचंड घाबरलो. पण एकनाथ शिंदे घाबरले नाहीत.  एकनाथ शिंदे म्हणाले हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर बघू, पण वर गेल्यावर काय बघणार असा मनात विचार आला आणि घाबरलो, असं यावेळी चंद्रहार पाटील यांनी सांगतिलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  विमानातून येत असताना वरून वैष्णव देवीचं मंदिर दिसलं, येता-येता वरतूनच वैष्णव देवीचं दर्शन घेतलं, साहेबांकडे पाहिलं तर त्यांनी आधीच पायातले बूट काढलेले होते. तेव्हाच वाटलं की मी देवासोबत काम करत आहे, आम्ही विशाखा पट्टणम येथे देखील रक्तदान करणार आहोत.  आज आपण देशासाठी काम करत आहोत, असंही यावेळी चंद्रहार पाटील यांनी म्हटलं.

शिवसेनेचं महाराक्त दान हे देशाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. इथे आलेल्या सर्व रक्त दात्यांचं अभिनंदन करतो, आम्ही वर्षभर हा उपक्रम राबवणार आहोत. जम्मू येथे येऊन असं रक्तदान करण कोणाचही काम नाही. ग्रामीण भागात आजही रक्ताची कमी आहे,  हाच विचारा करून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असं यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.