Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाडूकच घशात अडकलं, श्वासही घेता येईना, पंगतीतल्या जेवणानं अजोबा थरथरले; पुण्यात नंतर काय घडलं?

24 फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना 70 वर्षांच्या आजोबांनी चुकून हाड गिळलं होतं. त्यामुळे त्‍यांना खूप प्रचंड वेदना होत होत्‍या.

हाडूकच घशात अडकलं, श्वासही घेता येईना, पंगतीतल्या जेवणानं अजोबा थरथरले; पुण्यात नंतर काय घडलं?
ससून हॉस्पिटलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 26, 2025 | 1:23 PM

प्राण कंठाशी येणं … याचा अक्षरश: प्रत्यय पुण्यात एका वृद्धाला आला. मात्र देवदूत बनून आलेल्या डॉक्टरांमुळे त्या वृद्धाची सुटका झाली आणि त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. ससून रुग्‍णालयात एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. अन्ननलिकेत हाड अडकून छिद्र झालं, पण डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे ते काढलं! यशस्वीपणे हाड बाहेर काढून डॉक्टरांनी वृद्ध नागरिकाला जीवनदान दिले. तसेच अन्‍ननलिकेचे छिद्र बुजविण्यासाठी स्‍टेंटही टाकला. ससूनमधील या शस्त्रक्रियेच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नेमकं झालं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर येथील एका ७० वर्षीय वृद्धाने विवाह सोहळ्यात मांसाहार असलेले जेवण करताना चुकून हाडही गिळले. ते अन्ननलिकेत आडवे होऊन अडकले. या हाडामुळे रुग्‍णाच्‍या अन्ननलिकेत छिद्र झाले होते. मात्र त्यामुळे रुग्णाला पाणीदेखील पिता येत नव्‍हतं व श्‍वासही घ्यायला त्रास होत होता. ‍ससून रुग्‍णालयातील शल्‍यविषारदांच्‍या पथकाने ‘एंडोस्कोपी’द्वारे यशस्वीपणे हाड बाहेर काढून त्‍याला जीवनदान दिले. तसेच अन्‍ननलिकेचे छिद्र बुजविण्यासाठी स्‍टेंटही टाकला.

पंगतीतल्या जेवणानं आजोबा झाले अस्वस्थ..

24 फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना 70 वर्षांच्या आजोबांनी चुकून हाड गिळलं होतं. त्यामुळे त्‍यांना खूप प्रचंड वेदना होत होत्‍या. पुढील दोन दिवसांत त्यांना वेगवेगळ्या स्‍थानिक रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचार न झाल्‍याने त्‍यांना शेवटी त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे हाडाची अचूक स्थिती शोधून काढली. हाडाचे आकारमान 5.3 बाय 3 सेमी होते आणि ते आडवे अडकले होते. रुग्णाचे वय लक्षात घेता शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरले असते, म्हणून एंडोस्कोपीद्वारे हाड काढले. ही शस्त्रक्रिया 27 फेब्रुवारी रोजी शल्यविशारद (सर्जरी) विभागाचे सहयोगी प्राध्‍यापक डॉ. पद्मसेन रनबागळे यांच्‍या नेतृत्‍वाखाली कान नाक घसा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल ठाकूर, भूलतज्‍ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर यांच्‍या चमूने केले.

'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.