AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis : राहुल गांधींवर संशय येतोय, कुणाचा अजेंडा राबवत आहेत? देवेंद्र फडणवीस संतापले

राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत अनियमिततांचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाची पारदर्शकतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांच्यावर देशाची बदनामी करण्याचा आरोप केला आहे.

Devendra Fadanvis : राहुल गांधींवर संशय येतोय, कुणाचा अजेंडा राबवत आहेत? देवेंद्र फडणवीस संतापले
देवेंद्र फडणवीस राहुल गांधींवर संतापलेImage Credit source: social media
| Updated on: Apr 21, 2025 | 1:23 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात आहेत. अमेरिकेत संवाद साधताना त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. भारतीय निवडणूक प्रक्रियेत अनेक समस्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर वेळ संपल्यानंतरही मतदान झालं. त्याचा डेटा आम्हाला दिलाच नाही, असं सांगत राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोग पारदर्शक नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी कुणाचा अजेंडा राबवत आहेत? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला. ही दु:खद गोष्ट आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन देशाच्या प्रती, देशाच्या संविधानाने ज्या संस्था तयार केल्या आहेत त्यांच्याबाबत खोटं बोलत आहेत. त्या संस्थांबाबत खोटं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचं काम करत आहेत. लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ते अत्यंत चुकीचं काम करत आहेत. वारंवार निवडणूक हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भारताची बदनामी करणं बंद करा

परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली. विरोधी पक्षाचे नेते असताना आपल्या देशाची बदनामी करत असतील तर त्यांच्या बद्दल संशय निर्माण होतोय. ते कुणाचा अजेंडा राबवत आहेत? असा सवाल करतानाच जगभरात फिरून भारताची बदनामी करून मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासहार्यता वाढवली तरच मते मिळतील. पण ते करण्याऐवजी ते देशाची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रात हरले, दिल्लीत हरले, हरियाणात हरले. अतिशय बाळबोध प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावं आणि भारताची बदनामी करणं बंद करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

त्यांचीच उंची कमी होईल

कोणताही देशभक्त विदेशात जाऊन देशाची बदनामी करत नाही. असं करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावं आणि जनतेचा विश्वास संपादन करावा. तरच ते निवडणूक जिंकतील. नाही तर ते जिंकू शकणार नाही. भारताची अशी बदनामी केल्याने त्यांचीच उंची कमी होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहुल गांधी यांनी उद्योजक आणि प्रवाशी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाच्या निवडणूक प्रणालीवरच हल्ला चढवला. मी अनेकदा सांगितलंय… महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रौढ मतदारांपेक्षा अधिक लोकांनी मतदान केलं आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला फक्त सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतचेच आकडे दिले. पण संध्याकाळी 5.30 ते 7.30 वाजेपर्यंत 65 लाख मतदारांनी मतदान केलं. शारीरिक रुपाने एढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान करणं शक्यच नाही. एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे तीन मिनिटं लागतात. जर तुम्ही हा हिशोब धरला तर सकाळी 2 वाजेपर्यंत मतदान चाललं असतं. पण तसं झालं नाही. आम्ही व्हिडीओग्राफीची मागणी केली तर त्यांनी देण्यास नकार दिला. एवढंच नव्हे तर त्यांनी कायदाच बदलला, जेणेकरून कुणीच व्हिडीओग्राफीची मागणी करू नये, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.