वर्क फ्रॉम होममुळे वीजेचा वापर वाढला, प्रत्यक्ष रिडिंग घेऊ, तक्रारीसाठी ई-मेल आयडी : ऊर्जामंत्री

जे घरात राहत नव्हते. त्यांचं प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेतलं जाईल," असे उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले. (Nitin Raut On High Electricity Light Bill Issue) 

वर्क फ्रॉम होममुळे वीजेचा वापर वाढला, प्रत्यक्ष रिडिंग घेऊ, तक्रारीसाठी ई-मेल आयडी : ऊर्जामंत्री

मुंबई : राज्यामध्ये वाढलेल्या वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळीही तक्रार करत आहे. याच पार्श्वभूमीवर “ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी तीन आठवड्याची सवलत देण्यात आली आहे. तर जे घरात राहत नव्हते. त्यांचं प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेतलं जाईल,” असे उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले. (Nitin Raut On High Electricity Light Bill Issue)

“लॉकडाऊन काळात जे मार्गदर्शक तत्वानुसार मिटीर रिडिंग बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही गैरसमज बिलाबाबत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्याची सवलत वीज बिल भरायला देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना तक्रारी असतील त्यांच्यासाठी उर्जामंत्र्यांचा ईमेल आयडी देण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिकांनी वर्क फ्रॉम होम केले आहे. त्यामुळे वीजेचा वापर गेल्या वर्षापेक्षा जास्त केला आहे,” असेही उर्जामंत्र्यांनी सांगितले.

“त्याशिवाय स्थानिक प्रशासनाच्या पूर्व परवानगीने तसेच शासनाने कोविड 19 संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करुन वीज देयक संकलन केंद्र पुन्हा सुरु केली आहेत. जून 2020 वीजेच्या बीलमध्ये जास्त रक्कम दिसण्याचे कारण एप्रिल आणि मे महिन्यांचं बीलची सरासरी आणि हिवाळ्यातील वीज वापरानुसार देण्यात आले आहे. ग्राहकांना जितकी मदत होईल तितकी मदत द्यायचा आमचा प्रयत्न आहे,” असेही नितीन राऊत म्हणाले.

“जून 2020 चे बील कसे योग्य आहे हे ग्राहकांना समजवण्यासाठी तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना मदत कक्ष तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार मदत कक्ष तयार करण्यात आले आहेत,” असेही उर्जामंत्र्यांनी सांगितले.

“ग्राहकांशी वेबमिनार आणि फेसबुर लाईव्हवर चर्चा होत आहे. स्थानिक वृत्तवाहिनीवरदेखील ग्राहकांना समजवण्याचं काम केलं जात आहे,” असेही नितीन राऊत म्हणाले. (Nitin Raut On High Electricity Light Bill Issue)

पाहा व्हिडीओ : 


संबंधित बातम्या : 

मुंबईतील दयनीय अवस्थेला मुख्यमंत्री जबाबदार, निर्णय घेण्यास सरकार अपयशी : प्रसाद लाड

Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

इंधन दरवाढीला 21 दिवसांनंतर ब्रेक, पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *