AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही… पिक विम्यावरून कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; भाजपने फटकारलं

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना शेतकरी पिक विमा योजनेचे गुणगाण गाताना भलतेच बोलून गेले. त्यांनी यावेळी भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना आम्ही देत आहोत अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आणि हीट विकेट झाले.

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही... पिक विम्यावरून कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; भाजपने फटकारलं
| Updated on: Feb 14, 2025 | 7:37 PM
Share

शेतकऱ्यांसाठीची पिकविमा योजना बंद करायची कोणताही विचार नाही असे सांगताना या पिकविमा योजनेचे गुणगाण करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तोल सुटला. त्याभरात कोकाटे यांनी आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण एक रुपयात पिकविमा योजना मिळते असे बोलून गेले. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी तर माणिकराव कोकाटे यांच्यावर तोंड सुख घेतलेच परंतू सरकारमधील सहकारी पक्ष भाजपाने देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.

अमरावतीत पत्रकारांशी बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकरी पिक विमा योजनेचे गुणगाण करताना भलतेच बोलून गेले. त्यांनी यावेळी भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना आम्ही देत आहोत अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आणि वादंग उठले. पिकविमा योजनेची भलामण करताना ते म्हणाले की पिक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजेत. योग्य त्या शेतकऱ्याला तिचा लाभ मिळाला पाहिजे. यातले फायदे तोटे हे चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहे. सरकारला पिक विमा बंद करायची नाही. परंतु या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागतील असे कोकाटे म्हणाले.

परराज्यातील शेतकऱ्यांचे अर्ज आले

पिकविमा योजनेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी जो काही निर्णय घेऊ तो दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलून घेतला जाईल असे सांगताना कृषीमंत्र्यांनी विचार केला तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही मात्र एक रुपयांमध्ये पिक विमा दिला असे म्हटले आणि अडचणीत आले. या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. बाकी राज्यातील लोकांनी देखील ऑनलाईन अर्ज केले होते.

अल्पभूधारकाला एक आणि इतरांना वेगळा  शक्य नाही

आम्ही जेव्हा चौकशी केली त्यातून कळलं तेव्हा ते अर्ज आम्ही नामंजूर केले. परंतु यातून सरकार अडचणीत आलं असं नाही. असे विमा काढणारे सेंटर असे उद्योग करतात. या संदर्भात चौकशी सुरू आहे. या विमा योजनेमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. कशामुळं काही लोक गैरफायदा घेतात कंपन्या देखील लूटमार करत असतात. त्यामुळे निकष बदलले जातील. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतर शेतकऱ्यांना शंभर रुपये विमा असा निर्णय घेता येणार नाही. एक वेळी पिकाप्रमाणे विमा आकारता येईल परंतु एकाला शंभर रुपयात आणि एकाला एक रुपयात विमा देता येणार नाही असेही माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

भाजपाची टीका

माणिकराव कोकाटे सारख्या जबाबदार मंत्र्यांनी अशी विधानं करताना सावधता बाळगावी हवी होती. वक्तव्याचा विपर्यास होणार नाही याची काळजी घ्यावी , त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता असंही दिसतंय असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी बाजू सावरताना म्हटले आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...