AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची बैठक; अन् इकडे शिंदेंनी डाव टाकला, पक्षाच्या वर्धापनदिनीच ठाकरे गटात मोठा भूकंप?

मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची बैठक; अन् इकडे शिंदेंनी डाव टाकला, पक्षाच्या वर्धापनदिनीच ठाकरे गटात मोठा भूकंप?
| Updated on: Jun 18, 2025 | 8:20 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’वर माजी नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठीकीनंतर आता शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे.

आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक बोलावल्यानंतर देखील ठाकरेंचे 3 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.  या नगरसेवकांसोबत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनाच्या दिवशीच हे नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व माजी नगरसेवकांना सोबत राहून पक्ष वाढवण्यासाठी काम करा असं आवाहन केलं आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी सर्वतोपरी तुमच्यासोबत उभा असेल असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक काय निर्णय घेणार याकडे? सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान   मागील वेळेस अशीच नगरसेवकांची बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर लगेचच अनेक नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उद्या देखील शिवसेना ठाकरे गटाचे  माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेसोबत युतीबाबत चर्चा

दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबईतील पक्षाचे सर्व माजी नगरसेवक उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना मनसेबाबत युतीसंदर्भात विचारणा केल्याची माहिती समोर येत आहे. या माजी नगरसेवकांनी देखील मनसेसोबतच्या युतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ