Remdesivir : नागपुरात एक्सपायरी डेट संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सध्या तुटवडा जाणवत आहे. | Remdesivir injection

Remdesivir : नागपुरात एक्सपायरी डेट संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री
Remdesivir injection
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 10:40 AM

नागपूर: कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा (Remdesivir injection) काळा बाजार होत असल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात मुदत उलटून गेलेल्या (एक्स्पायरी डेट) रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री होत आहे. एक्स्पायरी डेट नमूद केलेल्या जागी नवे स्टिकर चिकटवून रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स रुग्णांच्या नातेवाईकांना विकली जात आहेत. त्यामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. ( Remdesivir injection supply in Nagpur)

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सध्या तुटवडा जाणवत आहे. मर्यादित साठा असल्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरु झाला होता. ही इंजेक्शन्स अव्वाच्या सव्वा भावाने विकली जात होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, आता एक्स्पायर झालेली रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय

नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय झाले होते. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत दमण येथील फार्मा कंपनीत दरेकर आणि लाड दाखल झाले होते.

देशात रेमेडेसिव्हीर निर्यातीवर बंदी

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय.

औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले होते.

संबंधित बातम्या :

राजेश टोपेंनी उल्लेख केलेला गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?

पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार, पाच हजार इंजेक्शन रवाना

( Remdesivir injection supply in Nagpur)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.