AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिय रोहित…आंदोलन करणाऱ्या लेक रोहित पवारांसाठी राजेंद्र पवारांची भावूक पोस्ट, दिले दोन महत्त्वाचे सल्ले

रोहित पवारांना त्यांच्या वडिलांनी राजेंद्र पवारांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सध्या पुण्यामध्ये रोहित पवारांच्या नेतृत्त्वामध्ये अनेक विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु आहे.

प्रिय रोहित...आंदोलन करणाऱ्या लेक रोहित पवारांसाठी राजेंद्र पवारांची भावूक पोस्ट, दिले दोन महत्त्वाचे सल्ले
rajendra pawar post for son rohit pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 6:42 PM
Share

सध्या देशात ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीने मोठे आंदोलन सुरु केले आहे. तर राज्यात एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नेतृत्त्व करत आहेत. दरम्यान, रोहित पवारांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण केले होते.

गेल्या काही दिवसांत या आंदोलनस्थळी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. राज ठाकरे, संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अभिजित दिपके यांनी हजेरी लावल्यानंतर तिथे मोठी भाषणं केली, त्यांनी सर्वांनी भूमिका मांडल्या. पण यासर्वामध्ये रोहित पवार एका बाजूला बसून दिसून आले. गेले अनेक दिवस ते विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत आहेत. त्यांना पाठिंबा देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांचे वडिल राजेंद्र पवार यांनी मुलासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये एका बापाच्या लेकाबद्दलच्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करुन दिली. त्यांनी यावेळी टीकाकारांनाही उत्तर दिलं आहे. ‘सोन्याच्या चमचा मी’ शोधू लागलो, असं म्हणत त्यांनी राजकारणातील एखादा साप जर तुला कधी चावला तर ते विष पचवायची तयारी ठेवच, पण त्याचसोबत त्याचे दात उपसायचीही तयारी ठेव, असं म्हटलं आहे.

राजेंद्र पवारांची पोस्ट जशास तशी

प्रिय रोहित, परवा MPSC च्या चालू आंदोलनात तुझ्यासोबत रस्त्यावर झोपलो.तुझा संघर्ष व कमिटमेंट असूनही विरोधक सतत म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधू लागलो.१९५४ ला ११० रुपये पगारावर माझे वडील आप्पासाहेब पवार नोकरीला लागले.२५ वर्षे नोकरी, उरलेली २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम.महाराष्ट्राला क्रॉसब्रीड गाईंची ओळख करून देऊन आजची ग्रामीण अर्थव्यवस्था दुधामुळे बदलली,१९८० ला ड्रिपचा प्रसार करून प्रथम पाणी बचतीचा मार्ग दाखवला. शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी काम केले,केंद्रसरकारने पद्मश्री दिली. शेवटपर्यंत सामाजिक काम करत असतानाही राजकारणी भावासाठी राजकीय मदत “थॅंकलेस जॉब” असला तरी करत राहिले.

तुझा बाप १९७८ साली अवघे ५०० डॉलर घेऊन अमेरिकेला संघर्षातूनच शिक्षण घेण्यास गेला.तिथल्या झगमगाटीतील सोन्याचा चमचा न पाहता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत आला.शेती ही आनंद व संघर्षाचे मिश्रण आहे,हे करत एक नावाजलेली संस्था सामाजिक भावनेतून चालवत असतानाच मुरघास,कृषिक Contract_Farming_in_Poultry व अनेक उपक्रमाची ओळख शेतकर्‍यांना करून देत आहे. तुझे कॉलेज संपल्यानंतर तू एकटा नोकरी न करता हजारो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत तू राजकारणात येण्यापूर्वी आपण स्वत:ची इंडस्ट्री उभी केली. लहानपणी तुला भारी खेळणी नव्हती म्हणून तू गड्यांची पोरं घेऊन मासे,खेकडे पकडायला ओढ्याने जायचास.ते धरताना बिळ सापाचे का खेकड्याचे याचा विचार न करता त्यात हात घालायचास,तुझी हात घालण्याची ही धाडसी सवय त्यामुळेच तयार झाली असावी.पण तू आता राजकारणात आहेस, राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव,आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही!

इतिहासात आणि आताही अनेक बापांना रडता आले नाही आणि काळजीही करता येत नाही.उभारणीच्या संघर्षात वेळ गेल्यामुळे लहानपणी खेळवताही आले नाही पण आता तुझ्या पाठीशी आहे. “लढ,संघर्ष अटळ आहे,ना तुझा बाप राजकारणात होता ना तुझ्या बापाचे मोठे राजकारण आहे!” त्यामुळे तुझा सोन्याचा चमचा तुला मिळणारही नाही पण स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर.

तुझा पाठीराखा बाप राजेंद्र पवार

Follow Us
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!