AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचं टेन्शन वाढलं, बारामतीमध्ये शरद पवारांचा मोठा डाव, घरातलाच उमेदवार दिला

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी समोर आली आहे, पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अजितदादांचं टेन्शन वाढलं, बारामतीमध्ये शरद पवारांचा मोठा डाव, घरातलाच उमेदवार दिला
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 24, 2024 | 6:49 PM
Share

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आले आहेत. सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे बारामती विधानसभा निवडणुकीकडे, बारामती विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.  मात्र राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार हे पुन्हा एकदा बारामतीमधून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट कोणता उमेदवार देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या उमेदवारांची पहिली  यादी आज जाहीर केली. या यादीसोबतच उत्सुकता देखील संपली आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात घरातीलच उमेदवार दिला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता काकाविरोधात पुतण्या अशी हाय होल्टेज लढत होणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार 

इस्लामपूर- जयंत पाटील काटोल- अनिल देशमुख घनसावंगी – राजेश टोपे कराड उत्तर – बाळासाहेब पाटील मुंबा कळवा – जितेंद्र आव्हाड कोरेगाव – शशिकांत शिंदे वसमत – जयप्रकाश दांडेगावकर जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर इंदापूर – हर्षवर्धन पाटील राहूरी – प्राजक्त तनपुरे शिरुर- अशोक पवार शिराळा – मानसिंगराव नाईक विक्रमगड – सुनील भुसारा कर्जत-जामखेड – रोहित पवार अहमदपूर – विनायकराव पाटील सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे उदगीर – सुधाकर भालेराव भोकरदन – चंद्रकांत दानवे तुमसर – चरण वाघमारे किनवट – प्रदीप नाईक जिंतूर – विजय भांबळे केज – पृथ्वीराज साठे बेलापूर – संदीप नाईक वडगाव शेरी -बापूसाहेब पठारे जामनेर – दिलिप खोडपे मुक्ताईनगर – रोहिणी खडसे मुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवे नागपूर पुर्व – दिनेश्वर पेठे तिरोडा – रविकांत बोपचे अहेरी – भाग्यश्री आत्राम बदनापूर – रुपकुमार चव्हाण मुरबाड – सुभाष पवार घाटकोपर (पुर्व) – राखी जाधव आंबेगाव – देवदत्त निकम बारामती – युगेंद्र पवार कोपरगाव – संदीप वर्पे शेवगाव – प्रताप ढाकणे पारनेर – राणी लंके आष्टी- मेहबूब शेख करमाळा – नारायण पाटील सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे चिपळून- प्रशांत यादव कागल – समरजीत घाटगे तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील हडपसर – प्रशांत जगताप

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...