AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, युद्धपातळीवर बचावकार्य चालू

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागांत पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेले आहे. दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, युद्धपातळीवर बचावकार्य चालू
raigad boat accident
| Updated on: Aug 21, 2025 | 2:57 PM
Share

Raigad Boat Accident : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागांत पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेले आहे. दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

समुद्राचे पाणी शिरल्याने बोट थेट बुडाली

मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारांची आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे. या बोटीचा आता शोध घेतला जात आहे. ही बोट अजूनही मिळालेली नाही. समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे. या बोटीमध्ये काही मच्छीमार होते. या मच्छीमारांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

सात प्रवाशांना वाचवण्यात आलं यश

समुद्रात बुडालेल्या या बोटीत एकूण सात खलाशी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या खुलाशांना वाचवण्यात येश आले आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला गेला.

बंदी असताना मच्छीमार जातायत समुद्रात

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली होती. या बोट दुर्घटनेत एकूण तिघांचा मृत्यू झाला होता तर सहा जाणांना वाचवण्यात यश आले होते. सध्या समुद्र उधाणलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत माच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. मात्र तरीदेखील आदेश झुगारून काही मच्छीमार मासे पकडायला समुद्रात जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत काय दिसत आहे?

उरणमधील बोट दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दुर्घटनाग्रस्त बोट समुद्राच्या पाण्यात हेलकावे खाताना दिसत आहे. तर काही लोक लाईफ जॅकेट परिधान करून दुर्घटनाग्रस्त बोटीतील मच्छीमारांना वाचवताना दिसत आहेत. सध्या सर्व सात खलाशांना वाचवण्यात येश आले ाहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.