तारळी नदीच्या पुलावर भीषण अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार

आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या पुलावर अपघात झालाय. (Five Death In Karad Umraj bus Accident)

  • दिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, कराड
  • Published On - 10:00 AM, 14 Nov 2020
तारळी नदीच्या पुलावर भीषण अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार

कराड : आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या पुलावर अपघात झाला आहे. मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. (Five Death In Karad Umraj bus Accident)

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनीबस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष आणि एक महिला तसेच तीन वर्षांचा मुलगा असे पाच जण जागीच ठार झाले आहेत.

उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळली. यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला. त्यानंतर नागरिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरु केले. (Five Death In Karad Umraj bus Accident)

संबंधित बातम्या

काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 3 मजूरांचा जागीच मृत्यू

LIVE | नंदुरबारमध्ये धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी