Ajit Pawar Plane Crash : आता अजित शिवाय बारामती साहेब सुद्धा विचार करू शकणार नाहीत, सूर्यकांता पाटील
Ajit Pawar Plane Crash : "अजितन स्वतःची सत्ता लोकांसाठी वापरली, स्वतःसाठी नाही,आता बोलण्यासारखं काहीच राहिले नाही. एवढ्या तरुण वयात मृत्यूसाठी सुद्धा आपलाच एअरपोर्ट निवडलं, तिथेच पडलं विमान"

“अजित सारखा नेता अशा पद्धतीने जाईल असं मला कधीच वाटलं नाही, लॉन्ग आयुष्य आहे असं वाटायचे याला. माझ्यापेक्षा तर पंधरा-सोळा वर्षांनी लहान होता. लहानाचा मोठा होताना आम्ही पाहिल्यामुळे माझ्या फार अपेक्षा होत्या त्यांच्याकडून. एवढा निर्भीडपणाचा, निर्भीड विचारांचा, भाडबीड न ठेवता काम करणारा नेता अंतुलेनंतर अजित बघितला, तो आपल्यातून गेलेला आहे. मनाला सुद्धा भीती वाटत आहे” असं माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील म्हणाल्या. “राजकारणात माणसं घडवावी लागतात. आपल्याकडे घडवण्यापेक्षा तुडवले जातात. त्यामुळे चांगले नेते अभावाने दिसतात” असं सूर्यकांता पाटील यांनी सांगितलं.
“अजित तर माझ्याशी ताई शिवाय कधी बोलला नाही, अजित पवार यांना नंतर अरेकारे बोलणारी पवार साहेबांनंतर मी एकटीच होते. नंतर मी सुद्धा अरे कारे बोलणं बंद केलं. आता अजित मोठा झाला, आपण अजितदादा म्हणायला पाहिजे मी दादा म्हणायला सुरुवात केली.एकदा ते म्हणाले सुद्धा मला तुम्ही कशासाठी दादा म्हणताय, मी म्हटलं आपण लाडाने म्हणतोय दादा, बाळा घरातले नाव असतात. मी त्यांना जाणवू दिले नाही की तुमच्या मोठेपणामुळे म्हणते. फार स्वच्छ मनाचा माणूस होता” असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
प्रतिभा वहिनी त्याला स्वतःचा मुलगा म्हणत होत्या
“अजित पवार यांच्या मनात आलं की पवार साहेब सुद्धा त्यांना थांबू शकत नव्हते. आता अजित शिवाय बारामती साहेब सुद्धा विचार करू शकणार नाहीत, साहेब स्वतः बारामतीत राहत नव्हते हा राहत होता. प्रतिभा वहिनी त्याला स्वतःचा मुलगा म्हणत होत्या, त्या घराचा तो खरा आधारस्तंभ बनला होता. महाराष्ट्राच्या राजकारणाचं अपरिमित नुकसान झालं आहे” असं सूर्यकांता पाटील यांनी सांगितलं.
अजितन स्वतःची सत्ता लोकांसाठी वापरली
“मला वाटत नाही अजितची जागा भरून निघेल म्हणून, अजित पवार मिटींगला आहेत म्हटलं की कपडे सावरून येत होते अधिकारी. मी डोळ्यांनी पाहिलं आहे. अजितन स्वतःची सत्ता लोकांसाठी वापरली, स्वतःसाठी नाही,आता बोलण्यासारखं काहीच राहिले नाही. एवढ्या तरुण वयात मृत्यूसाठी सुद्धा आपलाच एअरपोर्ट निवडलं, तिथेच पडलं विमान. राजकारणातला मला संकट काळ दिसत आहे. मंत्रिमंडळाची सगळी रया गेली आहे. अजित पवार नावाचा धाक नष्ट झालेला आहे.अजित पवार म्हणजे अधिकाऱ्यांवर धाक, भीती, दिलेला शब्द अधिकारी पाळायचा” अशा भावना सूर्यकांता पाटील यांना व्यक्त केल्या.
