Maharashtra Election News LIVE : अजित पवार यांच्या विमानाला अपघात, विमानातील काही जण जखमी
Live Updates in Marathi : राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली.

LIVE NEWS & UPDATES
-
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत खासदार सोनवणे यांचे अजब वक्तव्य
बीडसह इतर काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असताना आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यावर अजब वक्तव्य केले आहे. जिल्हा परिषद आता खासदार,आमदारांना आम्हालाच वाटतंय आता नाही झाली तर नाही झाली. आमचं चाललंय दुकान असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. खासदार सोनवणे यांच्या या वक्तव्यावरून आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
-
अजित पवार यांच्या विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान अपघात…
अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील काही जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे.
-
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिपळूण दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवार प्रचारासाठी फडणवीस चिपळूणमध्ये येत आहेत. चिपळूणमधील सावरकर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. 20 हजारांपर्यंत या मैदानात लोक जमतील, असा विश्वास भाजप नेते प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे.
-
खासदार बजरंग सोनवणे यांचे अत्यंत मोठे विधान, म्हणाले, राज्यातील…
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. येत्या दोन महिन्यात सरकारमध्ये बरेच काही बदल होणार असल्याचे त्यांनी म्हटले. येडेश्वरी साखर कारखान्याच्या ध्वजारोहण प्रसंगी बजरंग सोनवणे यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल.
-
15 नगरसेवक असलेल्या उद्धव ठाकरे गटाकडून गटनेता निवड
केशव पोरजे यांची करण्यात आली गटनेते पदी नियुक्ती. पंधरापैकी दहा नगरसेवक नाशिक रोड भागातून निवडून आल्याने पोरजे यांची निवड. ठाकरेंच्या शिवसेनेकडून केशव पोरजे यांना गटनेता करत नाशिकरोड विभागाला गट नेते पदाचा मान
-
-
पीएसआयची तक्रारदारास पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण
नांदुरा येथील तक्रारदार गोपाल नालट हे आपल्या परिसरातील सांडपाण्याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये गेले असता तक्रार घेण्यावरून पोलीस स्टेशनमध्ये पीएसआय घाटोळ यांच्या सोबत वाद झाला.. दरम्यान तक्रारदार पोलीस स्टेशन मध्ये व्हिडिओ शुटिंग काढत असताना पीएसआय घाटोळ यांनी तक्रारदार गोपाल नालट यास पोलिस स्टेशन मध्येच बेदम मारहाण केली आणि व्हिडिओ काढण्यास मज्जाव केला..
-
तपोवनात वृक्ष तोडी प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी
आज उच्च न्यायालयात तपोवन येथील झाड प्रकरणी झाली सुनावणी. याचिकाकर्ते नितीन पंडित आणि राज्य सरकार महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी देखील होते उपस्थित. 17 तारखेला पुन्हा उच्च न्यायालयात होणार सुनावणी
-
-
जळगावच्या चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावातील पुलावर बिबट्याचे दर्शन
रस्त्यावरून जात असलेल्या एका कारचालक्याने मोबाईलचे कॅमेरात बिबट्याला कैद केल. तापी नदीच्या पुलावरील कठळ्यावरून बिबट्या चालत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार…
मोहोळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांचं मोठं विधान. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादीची युती झाली. आतली गोष्ट सांगतो, बारामतीत अजित दादांसोबत आमची बैठक झाली. त्यावेळी जिल्ह्यातील चार आमदार आणि एक खासदारासह दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बैठकीला उपस्थित होतो.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. आता महापाैर पदावरून रस्सीखेच सुरू आहे. लवकरच पक्षांकडून सत्तास्थापनेबद्दल दावा केला जाईल. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे आहे. 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे चित्र स्पष्ट होईल. जिल्हा परिषद निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले. मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की कोण होणार यावरून विविध चर्चा सुरू आहेत. भाजपा जरी मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही शिवसेना शिंदे गटाच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणे भाजपाला शक्य नाही. एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत सन्मानपूर्वक पदे हवी आहेत. आज मुंबई महापालिकेच्या महापाैर पदावरून काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. यासोबतच इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Jan 28,2026 8:23 AM
