AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीनगरातील हर्सुल तलावात एकाच वेळी 4 तरुणांचा बुडून मृत्यू, रविवारची ठरली शेवटची सहल

छत्रपती संभाजीनगरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील हर्सुल तलवात एकाच वेळी चार जण बुडाले आहेत. या चारही जाणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेनंतर आता संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संभाजीनगरातील हर्सुल तलावात एकाच वेळी 4 तरुणांचा बुडून मृत्यू, रविवारची ठरली शेवटची सहल
chhatrapati sambhajinagarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2026 | 7:20 PM
Share

Chhatrapati Sambhaji Nagar : रविवार हा सुटीचा दिवस आहे. या दिवशी बाहेर जाऊ धम्माल मस्ती करायचं अनेकजण ठरवतात. त्यासाठी काही जण ट्रेकिंग, लाँग ड्राईव्हला जातात. तर काही लोक एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आजचा दिवस आनंदात घालवतात. काही लोकांना तलावाच्या ठिकाणी जायलाही आवडते. परंतु आनंद लुटण्यासाठी तलावात जाऊन पोहण्याचे धाडस कधीकधी जीवावर बेतू शकते. याचीच प्रचिती देणारी एक अत्यंत दुर्वैवी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या हर्सुल तलवात एकाच दिवशी चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

एकाच वेळी बुडाले चार जण

या घटनेननंतर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरालगत असलेल्या हर्सुलच्या तलावात या चौघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे चौघेही पोहण्यासाठी हर्सुल तलवात गेले होते. सुरुवातीला तीन तरुण बुडाले असल्याचे सांगितले जात होते. ही घटना समोर आल्यानंतर तेथील लोकांनी लगेच अग्निशामक दल आणि पोलिसांनी याबाबत कळवले. पोलीस तसेच अग्निशामक दलानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ घटनास्थळ गाठले. या तिघांचे तातडीने बचावकार्य करण्यात आले तिघांनाही बाहेर काढण्यात आले. त्याच वेळी तलावाच्या दुसऱ्या बाजूलाही आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती बचाव पथकाला समजली.

दोघांची ओळख पटली, दोघांच्या नातेवाईकांचा शोध सुरू

त्यानंतर तलावाच्या दुसऱ्या बाजूला बुडालेल्या तरुणालाही बाहेर काढण्यात आले. तलावाच्या बाहेर काढेपर्यंत या चौघांचाही मृत्यू झाला होता. चार तुरणांपैकी अफान खान आणि आदिल शेख अशी दोघांची नावे आहेत. उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे. चौघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या चारही तरुणांचा सहलीचा शेवटचा रविवार ठरला आहे. दरम्यान, फिरायला गेल्यानंतर उत्साहाच्या भरात जीवावर बेतण्यासारखे कोणतेही कृत्य करू नका, असे आवाहन केले जात आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल