AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant More : तात्या मरण्याआधी मला एकदातरी..त्या शिवसैनिकाचे शब्द वसंत मोरेंच्या मनाला भिडले, त्यांनी लगेच हलवली सूत्र

Vasant More : सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कठीण काळ आहे. मोठ्या प्रमाणात पडझड सुरु आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख वसंत मोरे यांनी चांगलं पाऊल उचललं आहे. पक्ष सोडणारे बहुतांश जण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखूवन त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Vasant More : तात्या मरण्याआधी मला एकदातरी..त्या शिवसैनिकाचे शब्द वसंत मोरेंच्या मनाला भिडले, त्यांनी लगेच हलवली सूत्र
Vasant More
| Updated on: Jul 02, 2026 | 11:31 AM
Share

सध्या राजकीय आखाड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी पडझड सुरु आहे. आधी सहा खासदार फुटले मग विधान परिषदेतील एक आमदार फुटला. 2022 नंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या झंझावातासमोर कसं टिकून रहायचं, हाच सध्या ठाकरे गटातील नेत्यांसमोरचा मुख्य प्रश्न आहे. कारण ठाकरे गटातून फक्त खासदार, आमदार फुटत नाहीयत, तर स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी, कार्यकर्तेही पक्ष सोडून चालले आहेत. मागच्या चारवर्षांपासून पक्षाला लागलेली गळती थांबतच नाहीय. पक्ष सोडणारे बहुतांश जण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखूवन त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सचिन अहिर यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर वरळीमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटाला बैठका घ्याव्या लागल्या.

उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिवसैनिकांना एकत्र करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी शाखा-शाखांवर आता जुन्या शिवसैनिकांचे मेळावे सुरु झाले आहेत. या दरम्यान आता पुणे शहरप्रमुख वसंत मोरे ज्येष्ठ शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर येणार आहेत. ठाकरे सेनेतील पडझडीनंतर ज्येष्ठ शिवसैनिक आता मातोश्रीवर जाणार आहेत. पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर येणार आहेत. “एकाबाजूला आपण पाहिलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी पक्ष सोडणारे आहेत. दुसऱ्याबाजूला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घ्यायचय म्हणून आसुसलेले चेहरे आहेत” असं वसंत मोरे म्हणाले.

घेऊन या म्हणून परवानगी दिली

“मी मागच्या महिन्यात जुन्या शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी अनेक शिवसैनिक विनंती करत होते की, तात्या आता तुम्ही पुणे शहर प्रमुख झालात, निदान तुमच्याकाळात तरी आम्हाला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन होऊं दे. एक शिवसैनिक तर असं म्हणाला की, तात्या मरण्याआधी मला बाळासाहेबांच्या खुर्चीच दर्शन घडवा. मी विनायक राऊत साहेबांमार्फत उद्धव साहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली. त्यानंतर साहेबांनी घेऊन या म्हणून परवानगी दिली” अशी माहिती पुणे शहर प्रमुख वसंत मोरे यांनी दिली. वसंत मोरे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. मनसेचे ते पुण्यातील चर्चित नगरसेवक होते. पक्षांतर्गत मतभेद झाल्यामुळे त्यांनी मनसे सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!