Pune Gangwar : भर दिवसा पुण्यात रक्ताचा सडा, धाडधाड गोळ्या घातल्या, गँगवॉरने पुणे हादरलं!
पुण्याच्या कोंढव्यात गँगवॉरमधऊन गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांकडून गोळबार करण्यात आला आहे.

Pune Ganesh Kale Murder Case : पुण्याच्या कोंढव्यात गँगवॉरमधऊन गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांकडून गोळबार करण्यात आला आहे. गणेश काळेवर सहा ते सात गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितनुसार गणेश काळे हा गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ आहे. वनराज आंदेकर प्रकरणात शस्त्र पुरवल्याप्रकरणी समीर काळे सध्या तुरुंगात आहे.
गोळ्या घातल्या, कोयत्यानेही हल्ला
पुण्यातील कोंढवा येथे ही घटना घडली आहे. मुख्य रस्त्याच्या शेजारीच गणेश काळेवर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. गणेश काळे हा रिक्षाचलक होता. गोळ्या घातल्यानंतर त्याच्यावर कोयत्यानेदेखील हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गणेश काळे मृत्युमुखी पडला आहे. आंदेकर टोळीतील तीन ते चार जणांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून प्राथमिक तपासाच्या आधारावर सांगितले जात आहे.
फॉरेन्सिक टीम दाखल, तपास सुरू
गणेश काळेवर गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावर पोलीस पोहोचले आहेत. सोबतच फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरील पुरावे जमा करत आहे. तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या जागेवर सामान्य लोकांना जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा संबंध काय?
मिळालेल्या माहितीनुसार या हत्याप्रकरणाचे धागेदोरे आता थेट वनराज आंदेकर खून प्रकरणाशी जोडले जात आहेत. गणेश काळे हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी असून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठीच समीर काळेचा भाऊ गणेश काळे याला गोळ्या घालून संपल्याचे बोलले जात आहे.
गोळीबार कोणी केला? पोलीस तपास सुरू
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गणेश काळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्यावर गोळ्या घातल्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोळीबार कोणी केला आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
