Gautami Patil: पत्र घेतलं, पण गौतमी पाटील गेली कुठे? खळबळ…
गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता, तिच्या कारने रिक्षाला धडक दिली, या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. यानंतर आता गौतमी पाटीलशी संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे.

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना हजारो लोक गर्दी करतात. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुण तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र आता गौतमी पाटील पुण्यातील एका अपघातामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता, तिच्या कारने रिक्षाला धडक दिली, या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. यानंतर आता गौतमी पाटील गायब असल्याची माहिती असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे.
गौतमी पाटील गेली कुठे?
पुण्यातील या अपघाता प्रकरणी गौतमी पाटीलला सिंहगड रोड पोलिसांनी पत्र दिलं होत. या पत्रात तिला तिचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. यासाठी तिला सिंहगड पोलीस ठाण्यात येण्याचे सांगण्यात आले होते. हे पत्र गौतमी पाटीलने स्वीकारले होते अशी माहितीही समोर आली आहे. मात्र गेले 4 दिवस गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गौतमी पाटील नेमकी गेली कुठे असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
नेमके प्रकरण काय?
30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक अपघात झाला होता. हा अपघात एक कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात झाला होता. या अपघातातील कार ही गौतमी पाटील हिची होती. गौतमीच्या कारने रिक्षाला मागून धडक दिली होती. या दुर्घटनेत रिक्षाचे चांगलेच नुकसान झाले होते. तसेच रिक्षाचलक जखमी झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण आणखी पेटले.
गौतमीला अटक करण्याची मागणी
हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईची मागणी केली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलला अटक करा, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे.
