AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil Accident : तो सीसीटीव्ही बाहेर आल्यास गौतमी पाटील अडचणीत? पुण्यातल्या घटनेत मोठी अपडेट!

Gautami Patil Accident : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना हजारो लोक गर्दी करतात. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुण तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. आता मात्र हीच गौतमी पाटील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला थेट अटक करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे […]

Gautami Patil Accident : तो सीसीटीव्ही बाहेर आल्यास गौतमी पाटील अडचणीत? पुण्यातल्या घटनेत मोठी अपडेट!
gautami patil
| Updated on: Oct 03, 2025 | 6:14 PM
Share

Gautami Patil Accident : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना हजारो लोक गर्दी करतात. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुण तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. आता मात्र हीच गौतमी पाटील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला थेट अटक करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून एका सासीटीव्ही फुटेजची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता गौतमीला अटक केली जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण एका अपघाताशी निगडित आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक अपघात झाला होता. हा अपघात एक कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात झाला होता. या अपघातातील कार ही गौतमी पाटील हिची होती. गौतमीच्या कारने रिक्षाला मागून धडक दिली होती. या दुर्घटनेत रिक्षाचे चांगलेच नुकसान झाले होते. तसेच रिक्षाचलक जखमी झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये बसलेली नव्हती, अशी प्राथमिक माहिती तेव्हा समोर आली होती.

गौतमीला अटक करण्याची मागणी

हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईची मागणी केली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलला अटक करा, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे.

त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्या

गौतमी पाटीलला अटक करावी, अशी मागणी करत रिक्षाचालकाचे कुटुंबीय थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणीही कुटुंबियांकडून पोलिसांकडे केली जात आहे. गौतमी पाटीलने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून...
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून....
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी.