नऊ वर्षाच्या मुलाची भरारी, अवघड तीन किल्ले एकाच वेळी केले सर

एप्रिल महिन्यात आग ओकणारा सूर्य असताना एखादी टेकडी सर करणे अवघड असते, मग अरुंद पाऊलवाट, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जागोजागी पायऱ्या नसल्याने रॉक क्लाइम्बिंग करून चढाई करणे किती अवघड. परंतु एक नऊ वर्षाच्या मुलाने एकाच वेळी तीन किल्ले सर केले.

नऊ वर्षाच्या मुलाची भरारी, अवघड तीन किल्ले एकाच वेळी केले सर
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 8:05 AM

शैलेश पुरोहित, इगतपुरी : इगतपुरी तालुक्याला सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेली आहे. या पर्वतरांगेतील अनेक गड किल्ल्यांना शिवकालीन वारसा लाभला आहे. यातील अलंग,मदन आणि कुलंग किल्ले अत्यंत खडतर समजले जातात. धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यांपुढे नतमस्तक होतात. टप्प्याटप्प्याने इगतपुरी तालुक्यातील ही तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील एका धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या साथीने एकाच वेळी तिन्ही किल्ले सर करून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कोणी केले किल्ले सर

घोटीतील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. भूषण धांडे यांचा नऊ वर्षाचा विहान या मुलाला लहान पणापासूनच ट्रेकिंगचा छंद आहे. वडीलांनाही हा छंद असल्याने हा छंद विहान यानेही जोपासला. वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विहान याने लहान पणापासूनच लहान व सोपे गडकिल्ले सर केले. मात्र शिवकालीन वारसा लाभलेल्या अलंग, मदन आणि कुलंग या तिन्ही किल्ले एकाच वेळी सर करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. मात्र हे तिन्ही किल्ले खडतर व अवघड असल्याने आरंभीच्या काळात वडीलांनी नकार दिला. मात्र विहान हा जिद्दीवर पेटल्याने अखेर हे किल्ले पादाक्रांत करण्याचे निश्चित झाले.

हे सुद्धा वाचा

रॉक क्लाइम्बिंग करून चढाई

आग ओकणारा सूर्य,अरुंद पाऊलवाट, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जागोजागी पायऱ्या नसल्याने रॉक क्लाइम्बिंग करून चढाई अशी खडतर कसरत करीत विहान यांने आपले वडील डॉ. भूषण धांडे यांच्या साथीने सलगपणे तिन्ही किल्ले यशस्वीपणे सर केले. विहान याला या मोहिमेत डॉ. भूषण धांडे, कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, घाटघर येथील एकनाथ खडके आदींचे मार्गदर्शन लाभले. विहान याच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

मोहीम सोपी नाही

कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. समोर मोठा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही.

मदनचा रॉक पॅच अलंगपेक्षा सोप्पा असला, तरी खाली खोल दरी असल्यामुळे मनात धडकी भरवणारा आहे. यामुळे काळजी घेऊन सर्व साधनांचा योग्य तो वापर करुन हा किल्ला सर करावा लागतो. या किल्ल्यातील शेवटचा रॉक पॅच क्लाइम्ब करून पुढे जावे लागते. विहानने ही मोहीम फत्ते केली.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.