मुलींनी अभिजीत दिपके यांना सांगितले प्रेग्नन्सी टेस्टबद्दल… थेट मोठा निर्णय, आजपासून..
अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा आदिवासी आश्रम शाळेकडे वळवला आहे. अभिजीत दिपके यांच्या भेटीला काही विद्यार्थींनी पोहोचल्या होत्या.

मे महिन्याच्या अखेरीस अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभरात आंदोलन पुकारले. जंतर मंतरवर त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी विविध शहरात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यानंतर सरकारला मोठ्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर विविध आंदोलनात कॉकरोच जनता पार्टी उतरली आहे. CJP ने सरकारी शाळांच्या नादुरुस्ती आणि असुविधांचा मुद्दा हाती घेतला आहे. राजकारणात सध्याच प्रवेश करणार नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले. त्यातच कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट पडली.
आता अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा आदिवासी शाळांकडे वळवला आहे. अभिजीत दिपके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या कोणताही मनात संकोच न ठेवता मांडल्या. जवळपास सर्वच आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थींचे शोषण होते. हेच नाही तर अनेक विद्यार्थींची गर्भवती असलेली टेस्टही करण्यात आली. अभिजीत दिपके यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी पोहोचले होते.
हेच नाही तर मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी आदिवासी समाजाच्या मुलांना आरोपी केले जाते. हेच नाही तर सरकारी आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत. यादरम्यान विद्यार्थ्यांनी सरकारी भंडाऱ्यातील शाळेचा उल्लेख वारंवार केला. भंडाऱ्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थींना एकाच रूमध्ये 15 जणांना ठेवले जाते. आता अभिजीत दिपके आदिवासी आश्रम शाळेचा मुद्दा उचलणार आहेत.
भंडाऱ्याच्या दिशेने अभिजीत दिपके निघू शकतात. अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शाळेंचीही पाहणी केली. आता त्यांनी आदिवासी आश्रम शाळेकडे आपला मोर्चा वळवला आहे. अभिजीत दिपके यांचा पक्ष देशभरात विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना दिसतोय. पहिल्याच आंदोलनात त्यांना मोठे यश आले. थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला.
