AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखोंचा खर्च, पण पदरात माती…; आखाती देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कुठे काय स्थिती?

आखाती देशांमधील युद्धामुळे महाराष्ट्रातील टरबूज, कांदा आणि अंडी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून, आंतरराष्ट्रीय वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

लाखोंचा खर्च, पण पदरात माती...; आखाती देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कुठे काय स्थिती?
farmer
| Updated on: Apr 05, 2026 | 1:45 PM
Share

आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचे भीषण परिणाम महाराष्ट्रातील शेती आणि पूरक व्यवसायांवर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गातील अडथळे आणि वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे टरबूज, कांदा आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

टरबूजाला केवळ ३ ते ४ रुपये प्रतिकिलो दर

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात यंदा टरबूजाचे विक्रमी उत्पादन झाले होते. मात्र, ऐन हंगामात निर्यात बंद झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे टरबूजाला केवळ ३ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. लागवड, खते आणि मजुरीचा विचार करता शेतकऱ्यांना साधा उत्पादन खर्चही काढणे कठीण झाले आहे. हा माल शेतात सडून जाण्यापेक्षा शेतकरी आता रस्त्याच्या कडेला बसून टरबूज विकत आहेत. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला माल आता मातीमोल भावाने विकावा लागत आहे, अशी हळहळ शेतकरी व्यक्त करत आहेत.

कांद्याच्या दरात मोठी घसरण

तर दुसरीकडे आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यमन आणि इजिप्तमधून ट्रकद्वारे स्वस्त कांदा आखाती देशांत पोहोचत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली आहे. युद्धामुळे जहाजांचे मार्ग बदलल्याने कंटेनर भाडे ६००-७०० डॉलरवरून थेट ६५०० डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे निर्यात करणे व्यापाऱ्यांसाठी अशक्य झाले आहे.

गेल्या मार्चच्या तुलनेत निर्यात ४५ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी जो कांदा ३००० रुपये प्रति क्विंटलने विकला जात होता, तो आता १४०० ते १५०० रुपयांवर स्थिरावला आहे. यामुळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी सरकारकडे १० टक्के निर्यात सबसिडीची मागणी केली आहे.

अंडी झाली स्वस्त

आखाती देशांमध्ये होणारी अंड्यांची निर्यात युद्धामुळे पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे भारतातील अंडी साठ्याचा पुरवठा स्थानिक बाजारात वळवण्यात आला आहे. एका अंड्याचा उत्पादन खर्च साधारण ५ रुपये असताना सध्या बाजारात अंड ३.५० ते ४ रुपयांना विकले जात आहे. प्रत्येक अंड्यामागे व्यावसायिकांना १ ते १.५० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. एका बाजूला कोंबड्यांच्या खाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला विक्रीतून मिळणारे उत्पन्न घटल्याने पोल्ट्री व्यावसायिक कर्जबाजारी होण्याच्या वाटेवर आहेत.

दरम्यान युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील समीकरणे बदलली आहेत. जर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक खर्चात सवलत किंवा निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले नाही तर हे कृषी संकट येणाऱ्या काळात अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल