गेल्या 30 वर्षांपासून मनमाड-मुंबई धावणारी गोदावरी एक्सप्रेस आजपासून बंद, प्रवासी वैतागले

गेल्या 30 वर्षा पासून नाशिककरांशी ऋृणानुबंध जुळलेली गोदावरी एक्सप्रेस मध्य रेल्वे आज पासून बंद केली असल्याने या ट्रेन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही गाडी प्रवाशांच्या सोयीची होती. ही गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

गेल्या 30 वर्षांपासून मनमाड-मुंबई धावणारी गोदावरी एक्सप्रेस आजपासून बंद, प्रवासी वैतागले
godavari expressImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 2:06 PM

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मालेगाव | 13 नोव्हेंबर 2023 : गेल्या 30 वर्षांपासून मनमाड ते मुंबई अशी धावणारी गोदावरी एक्सप्रेस मध्य रेल्वेने आजपासून बंद केली आहे. नाशिककरांना इतक्या वर्षांपासून सेवा देणारी ही गोदावरी एक्सप्रेस अचानक बंद केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गाडीच्या जागी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते धुळे ही नवीन ट्रेन सुरु केली आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि या भागातील सर्वसामान्य प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथून सोडण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेने केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.

कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ट्रेन क्रमांक 12118 एलटीटी – मनमाड सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईतून सकाळी 8.35 वाजता सुटायची आणि दुपारी 1 वाजता मनमाडला पोहचायची. ही गाडी नोकरदार, व्यापारी, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. या ट्रेन ऐवजी आता मध्य रेल्वेने 12 नोव्हेंबर पासून ट्रेन क्रमांक 11011 / 11012 सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस सुरु केली आहे. 12 नोव्हेंबरपासून ट्रेन क्रमांक 11011 सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस सीएसएमटी येथून दुपारी 12 वा. सुटून धुळ्याला रा. 8.55 वाजता पोहचणार आहे. परतीची ट्रेन 11012 धुळे – सीएसएमटी ही धुळ्याहून सकाळी 6.30 वाजता सुटून दुपारी 2.15 वाजता सीएसएमटीला पोहचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जमढा, शिरुड असे थांबे असणार आहेत. या गाडीला 16 एलएचबी डबे असणार आहेत. एक एसी चेअर कार, 13 नॉन एसी चेअर कार ( 5 आरक्षित आणि 8 अनारक्षित ), 1 जनरल सेंकडक्लास कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर अशी डब्याची रचना असणार आहे.

या गाड्या झाल्या बंद

12 नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने नवीन 11011/11012 सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस सुरु केल्यामुळे 01065/01066 दादर- धुळे स्पेशल आणि 02101/02102 दादर – मनमाड स्पेशल 12 तारखे पासून बंद करण्यात आल्या आहेत. गोदावरी राज्यराणी सुपरफास्ट एक्सप्रेस देखील बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.