AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss… तुझ्या घरात नाही पाणी, घागर… गोविंदांचा ‘थरथराट’, महाराष्ट्रभर जल्लोष

आज गोकुळाष्टमीनिमित्त महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन झाले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत हजारो गोविंदा उत्साहाने सहभागी झाले आहेत. राजकीय पक्षांचाही या उत्सवात मोठा सहभाग आहे.

ढाक्कूमाक्कुम ढाक्कूमाक्कुमsss... तुझ्या घरात नाही पाणी, घागर... गोविंदांचा 'थरथराट', महाराष्ट्रभर जल्लोष
दहीहंडीची धूम
| Updated on: Aug 16, 2025 | 10:32 AM
Share

आज गोकुळाष्टमीचा सण.. राज्यात अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.  मुंबईसह उपनगरांत आज दहीहंडीची मोठ्या प्रमाणात धूम पहायला मिळत आहे. ढाक्कू माकूम, ढाक्कू माकूम.. मच गया शोर सारी नगरी या गाण्यांवर ताल धरत, मुसळधार पाऊस असूनही जराही उत्साह कमी न होऊ देता गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पालिकेच्या निवडणुकी निमित्त या अनेक राजकीय पक्षांकडून दहीहंडीचा आयोजन मुंबई शहर आणि उपनगरात करण्यात आलं आहे. दादर येथील आयडियल बुक डेपो जवळील साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला सुरवात झाली आहे. महिला गोविंद पथक हे या दहीहंडी उत्सवात सहभागी झालं आहे. तेजस्विनी महिला गोविंदा पथकाकडून आयडियल बुक डेपो येथील दहीहंडीला सलामी देण्यात आली.

ठाण्यातही गोकुळ हंडीचे भव्य दिव्य आयोजन

ठाण्यात अल्पावधीतच प्रतिष्ठेची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅसलमिल येथील शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने गोकुळ हंडी चे भव्य दिव्य आयोजन कृष्णा पाटील यांनी केलं आहे. ठाणे शहरातील गोविंदा पथकांमध्ये सलामी देण्यामध्ये मोठी चुरस असून, सकाळच्या सुमारास या ठिकाणी ठाणे शहरातील असंख्य गोविंदा पथकांचे प्रतिनिधी आपल्या गोविंदा पथकांची नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे आहेत. यावरूनच या दहीहंडीचा नावलौकिक मोठा असल्याचा दिसून येत आहे.

कल्याण-डोंबिवलीत 325 दहीहंड्यांचा जल्लोष, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात

दरम्यान यंदा कल्याण-डोंबिवलीत खासगी 275 व सार्वजनिक 50 मिळून एकूण 325 दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी राजकीय नेते व सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकातील शिंदे-ठाकरे गटाच्या समोरासमोरच्या दहीहंड्या या विशेष आकर्षण ठरणार आहेत.

मात्र दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, त्याच पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी SRPF तुकडी, 22 निरीक्षक, 71 अधिकारी आणि 600 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अनेक दिवसापासून सराव करणाऱ्या गोविंदा आज मानवी मनोरा रजत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटणार आहेत. गोविंदाच्या सुरक्षेसाठी अनेक सार्वजनिक व खाजगी मंडळाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे.

आयडियल बुक डेपो येथील दहीहंडी उत्साहात सायबर सुक्युरिटी संदर्भात एक पथनाट्य सादर करण्यात आलं.

जय जवान गोविदा पथकाने मानाची दहीहंडी फोडली असून ते इतर ठिकाणी सलामी द्यायला सज्ज झाले आहेत. जय जवान गोविंदा पथक सुरवातिला दादर येथील हिंदू कॉलनी येथे 9 थरांची सलामी देणार आहेत.

संपूर्ण मुंबईला आणि महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमचं अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होईल  असा विश्वास  जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.