नागझिरा जंगलातील राजकुमार गेला, नागपूरला नेत असताना मृत्यू

कारच्या धडकेत या राजकुमार वाघ गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला आणि पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती.

नागझिरा जंगलातील राजकुमार गेला, नागपूरला नेत असताना मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:27 PM

गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नागझिरा-नवेगावबांध जंगल पसरला आहे. या जंगलात आधी ११ वाघ होते. दोन वाघिणी आणखी चंद्रपूर जिल्ह्यातून आणून सोडण्यात आल्या. त्यामुळे या जंगलात वाघांची संख्या १३ झाली आहे. त्यापैकी एका वाघिणीच्या बछड्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना काल रात्री घडली. एका कारच्या धडकेत नर वाघ गंभीर जखमी झाला. जखमी वाघाला उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात येत होते. मात्र वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला. सदर नर वाघ हा नवेगाव नागझिरा तील T 14 वाघिणीचा 2 वर्षाचा बछडा होता. म्हणजे या जंगलातील तो राजकुमार होता. आज सकाळी 5 वाजता पासून त्याला रिसक्यु करण्याचे प्रयत्न सुरु झाले. सकाळी 7:30 वाजता त्या वाघाला जेरबंद करण्यात यश आले. त्याला उचारासाठी नागपूर येथे नेण्यात येत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

वनविभागाची शोधमोहीम

कारच्या धडकेत या राजकुमार वाघ गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला आणि पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या अपघाताची माहिती वनविभाग गोंदियाला मिळाली. वनविभागाने रात्री पासूनच त्या वाघाला शोधण्याचे काम सुरू केले.

सकाळी 5 वाजतापासून त्या राजकुमाराला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले. सकाळी 7:30 वाजता जखमी वाघाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तो वाघ हालचाल करू शकत नव्हता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

हायवेमुळे अपघात

या वाघाचे शवविच्छेदन नागपूर येथील गोरेवाडा येथे करण्यात येणार आहे. त्याच्यावर अंतिम संस्कार नागपूर येथे करण्यात येणार आहेत. मुरदोली जंगल परिसरात नेहमी वाघांचे आणि इतर जंगली प्राण्यांची ये-जा असते.

हायवेमुळे नेहमी वन्यप्राणी कधी जखमी होतात, तर कधी मृत्यूमुखी पडतात. अपघात झालेला परिसरातील हा रस्ता नागझिरा-नवेगाव कॉरिडॉरमधून जातो. वनविभाग आणि प्रशासनाने उपाय योजना करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.