Gondia tribal : हर घर तिरंगा ठीक हैं साहब, तिरंगा तो हमार पास हैं, बस एक घर दिला दो, तिरंगा लगाने के लिये…

देवरी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती आफताफ (अन्नू ) शेख यांच्या संकल्पनेतून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. देवरी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

Gondia tribal : हर घर तिरंगा ठीक हैं साहब, तिरंगा तो हमार पास हैं, बस एक घर दिला दो, तिरंगा लगाने के लिये...
गोंदियात रांगोळी स्पर्धा, हर घर तिरंगा
Image Credit source: t v 9
शाहिद पठाण

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 14, 2022 | 8:31 PM

गोंदिया : नगर पंचायतीच्या बांधकाम सभापतींनी अमृत महोत्सवा निमित्ताने रांगोळी स्पर्धा (Rangoli Competition) आयोजित केली. समता गणेश उत्सव मंडळ (Samata Ganesh Utsav Mandal) यांच्या सहभागाने रांगोळीच्या माध्यमातून विविध प्रकारची चित्राकृती (Painting) साकारली. अनेक स्पर्धकांनी सहभाग घेऊन रांगोळीच्या माध्यमातून वास्तविक परिस्थिती मांडली. आदिवासी भागातील चित्राकृती रांगोळीच्या माध्यमातून झेंडा आहे पण घर नाही चित्रण रेखाटले. विशेष बाब म्हणजे एका तरुणाने आपल्या रांगोळीच्या माध्यमातून हर घर तिरंगा ठीक हैं साहब, तिरंगा तो हमार पास हैं, बस एक घर दिला दो, तिरंगा लगाने के लिये, अशी कलाकृती रेखाटली. या रांगोळीने आदिवासींचे चित्र सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

देशभक्ती गीत गायनाचा कार्यक्रम

गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या देवरी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती आफताफ (अन्नू ) शेख यांच्या संकल्पनेतून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. देवरी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या रांगोळी स्पर्धेमध्ये महिलांबरोबर पुरुषांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. या रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांनी स्वच्छ भारत मिशन, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, बेटी बचाव, बेटी पढावपासून तर भारतीय स्वातंत्र्याच्या काळापासून दांडी यात्रा, भारताने जिंकलेला क्रिकेट वर्ल्ड कप, कारगिल विजय, नोट बंदी, GST, राममंदिरापासून तर कोविडचे चित्रण रांगोळीच्या माध्यमातून साकारले. सोबतच देशभक्ती गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

rangoli n

देशभक्तीमय वातावरण

राज्यात सर्वत्र देशभक्तीमय वातावरण आहे. अशात आदिवासी महिला तिरंगा नहीं घर होना, अशी आर्त हाक देते.
या रांगोळी स्पर्धेत सेव्ह गर्ल चाईल्डचं चित्र भाव खाऊन गेलं. आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त कारगिल दिनावर रांगोळी काढण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाची रांगोळीही देशाची प्रतिमा उंचावणारी आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें