Gram Panchayat Election Results 2021 : पंढरपुरात भाजपचं जंगी सेलिब्रेशन, परिचारक गटाची विजयी सलामी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 18, 2021 | 10:31 AM

उपरी, गोपाळपूर, गादेगाव, सुपली, खर्डी, भाळवणीत आमदार परिचारक गट आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

Gram Panchayat Election Results 2021 : पंढरपुरात भाजपचं जंगी सेलिब्रेशन, परिचारक गटाची विजयी सलामी
भाजप

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 72 पैकी जागांपैकी जैनवाडी ग्रामपंचाय बिनविरोध असून उरलेल्या 71 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे. यामध्ये एकलासपूरमध्ये भाजप आमदार परिचारक गटाने विजयी सलामी दिली आहे. तर उपरी, गोपाळपूर, गादेगाव, सुपली, खर्डी, भाळवणीत आमदार परिचारक गट आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामउळ इथं सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. (Gram Panchayat Election Results 2021 BJP Celebration in Pandharpur Paricharak Group Wins)

हाती आलेल्या निकालांनुसार, पंढरपूर तालुक्यातील भाजपचा विजयी घौडदौड सुरू आहे. अनेक जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटाची सत्ता कायम आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून 7 पैकी 7 जागांवर भाजपचा विजयसिंह मोहिते-पाटील गटाने आपला झेंडा फडकविला आहे.

यानंतर विजयी उमेदवारांनी रॅली काढण्यात आपला आनंदोत्सव साजरा केला. इतकंच नाही तर आता भाजपच्या कार्यकर्त्यांचाही जल्लोष सुरू झाला आहे. माळशिरससोबतच पंढरपूर सांगोल्यात भाजपची घोडदौड कायम आहे. येळीव , विजयवाडी , खळवे , विठ्ठलवाडी या ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाने जिंकल्या. इतकंच नाही तर चौथ्या फेरीनंतर रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाची सत्ता आहे.

पंढरपूरमधील अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात चुरस पाहताना दिसत आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती आहे सत्ता. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिले आहे. इथल्या 17 जागांपैकी एका जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले आहे. त्यामुळे अकलूजच्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Gram Panchayat Election Results 2021 BJP Celebration in Pandharpur Paricharak Group Wins)

संबंधित बातम्या – 

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम, आदर्श ग्राम पॅनलचा दणदणीत विजय

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 : निकालाचा पहिला मान कोल्हापुरात, पाडळीवर जनसुराज्यचा विजय

(Gram Panchayat Election Results 2021 BJP Celebration in Pandharpur Paricharak Group Wins)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI