AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपकडून शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंना हादरा, घडामोडींना वेग

काही दिवसांपूर्वीच राज्यात महापालिकांची निवडणूक झाली, त्यानंतर महापौरपदासाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे, आता या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे,

मोठी बातमी! भाजपकडून शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंना हादरा, घडामोडींना वेग
महायुती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 30, 2026 | 2:57 PM
Share

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं, शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपने या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. जरी भाजप हा राज्यात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक ठिकाणी भाजप बहुमतापासून दूर आहे. त्यांना जर सत्ता स्थापन करायची असेल तर शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा लागणार आहे, अशी स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बार्गेनिंग पावर वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच, मात्र प्रत्यक्षात उलटच घडताना दिसत आहे.

ठाणे हा शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो.  ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 75 नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपचे 28 नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होईल अशी चर्चा सुरू असतानाच भाजपनं गेम फिरवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये सव्वा -सव्वा वर्षांचा फॉर्म्यूला ठरला आहे. पहिलं सव्वा वर्ष हा शिवसेना शिंदे गटाचा महापौर असणार आहे, तर त्यानंतर सव्वा वर्ष हा भाजपचा महापौर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

त्यानुसार आता शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.  तर दुसरीकडे भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्यानं आता ठाण्याच्या नव्या महापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर तर  उपमहापौर म्हणून भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर दुसऱ्या सव्वा वर्षामध्ये महापौरपद हे भाजपकडे येणार असून, उपमहापौर हा शिवसेना शिंदे गटाचा असेल असं बोललं जात आहे.

दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.