मी आधीच सांगितलं होतं, नाथाभाऊ भाजपला रामराम ठोकणार, आता सोबत मिळून काम करणार : गुलाबराव पाटील

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्या रुपाने आता महाविकास आघाडीची ताकद वाढेल, असा विश्वास शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

मी आधीच सांगितलं होतं, नाथाभाऊ भाजपला रामराम ठोकणार, आता सोबत मिळून काम करणार : गुलाबराव पाटील

जळगाव : “मी आधीच सांगितलं होतं नाथाभाऊ भाजपला रामराम ठोकतील. आज त्यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे मी स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल”, असा विश्वास शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. (Gulabrao patil On Eknath khadase Decision Join NCp)

“एकनाथ खडसे यांचं विधानसभेतलं भाषण ऐका. त्यांचा पक्षांतराचा सूर त्यावेळीच होता. तेव्हापासून मी सांगतोय नाथाभाऊ भाजपला रामराम ठोकतील. आज अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा कोणताही वाद नाही. शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“यापूर्वी नाथाभाऊंसोबत जे काही झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. आता ते राष्ट्रवादीत आल्याने महाविकास आघाडीची मोठी ताकद वाढणार असल्याचं पाटील म्हणाले. तसंच नाथाभाऊ सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत, त्यामुळे जळगावमध्ये आम्ही हातात हात घालून काम करु”, असं ते म्हणाले.

“2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप-सेना युती तोडण्याची घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती, यावर बोलताना पाटील म्हणाले, नाथाभाऊंसोबत आमची कटुता कधीच नव्हती. शेवटी विचारांशी आपण भांडत असतो. त्यामुळे व्यक्तीशी वैर असण्याचा प्रश्न नसतो.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “भाजपने शिवसेनेसोबत कधीही ट्युनिंग पाळलं नाही. आमच्या शिंगाड्यानं माती काढून आम्ही विजयी होत आलो आहोत. आता राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आहेत. त्यामुळे साहजिक महाविकास आघाडीची ताकद वाढून भाजपला मोठा तोटा होईल.”

दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर देखील पाटील यांनी लक्ष वेधलं. शिवसेना आणि पंकजा मुंडे यांचं नातं जास्त घनिष्ट आहे. त्यांनी शिवसेनेत यावं. त्यांनी सेनेत काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे, असं पाटील म्हणाले. (Gulabrao patil On Eknath khadase Decision Join NCp)

संबंधित बातम्या

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *