AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rave Party :अशी कोणाला मुभा मिळते का? पुण्याच्या रेव्ह पार्टीप्रकरणानंतर सदावर्तेंचा हल्लाबोल, सांगितला कायदा!

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रेव्ह पार्टीत पकडले गेलेल्यांचे समर्थन करणे दळभद्रीपणा आहे, अशी टीका केलीय.

Pune Rave Party :अशी कोणाला मुभा मिळते का? पुण्याच्या रेव्ह पार्टीप्रकरणानंतर सदावर्तेंचा हल्लाबोल, सांगितला कायदा!
gunratna sadarvate and pranjal khewalkar
| Updated on: Jul 27, 2025 | 8:59 PM
Share

Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आलंय. या प्रकरणात प्रांजक खेवलकर यांच्यासह सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान खडसे यांच्या जावायला अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून न्यायालयाची आणि कायदा यावर भाष्य केलंय.

पकडल्या गेलेल्याचे समर्थन करणे हा दळभद्रीपणा

मी याआधी रेव्ह पार्टीसारख्या गोष्टींचे समर्थन करताना कोणालाही पाहिले नव्हते. ज्या प्रकारे त्यावर चर्चा शुरु आहे ते विदारक आहे. खासकरून सुषमा अंधारे आणि विद्या चव्हाण या नेत्या पुण्यात घडलेला प्रकार रेव्ह पार्टी नव्हती फक्त पार्टी होती, असं सांगत आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र अशा गोष्टीत पकडल्या गेलेल्याचे समर्थन करणे हा दळभद्रीपणा आहे. असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही, असी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तसेच ही कोणती नीतिमत्ता आहे? हे कोणत्या पद्धतीचा समर्थन आहे? असे थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

न्यायालयाचा किंवा अनेक यंत्रणांचा वॉच असतो

पुढे बोलताना त्यांनी रेव्ह पार्टी प्रकरणाचा तपास आणि न्यायालयाचा वचक यावरही भाष्य केलंय. खडसे असले किंवा कोणीही तरी असे प्रकार करायचा कोणाला परवाना मिळतो का? काहीही केलं तरी अटक होणार नाही, अशी कोणाला मुभा मिळते का? असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. सध्याचे युग एवढे पुढे गेले आहे कोणताही मंत्री कोणत्या पोलिसांना काही चुकीचं सांगत नसतो. विशेष म्हणजे अशा गोष्टींवर न्यायालयाचा किंवा अनेक यंत्रणांचा वॉच असतो. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीमुळे सर्वकाही उघडं पडतं, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

राज-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर सतावर्ते काय म्हणाले?

पुढे बोलताना सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केलं. दोघे एकत्र आल्याने काय फरक पडणार आहे ? तुमच्या डोक्यातले लोकांच्या बाबतीतले विचार जनता विसरणार आहे का? साधू संत,गंगा मैया आणि तुमचे भाषिक वाद करणारे विचार हे लोकांच्या डोक्यातून जाणार आहेत का ? आज लोकांचा विचार एका उंचीवर गेलेले आहेत. लोक हुशार झालेले आहेत. या दोघांचाही राजकारणात ठणठण गोपाळा झालेला आहे, अशी खरमरीत टीका गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.