AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुणरत्न सदावर्ते संतापले, पहिल्यांदाच सरकारविरोधात घेतली मोठी भूमिका, थेट एका एका मंत्र्याचं नाव घेऊन…

मोठी बातमी समोर येत आहे, गुणरत्न सदावर्ते यांनी या जीआरवरून नाराजी व्यक्त केली असून, सरकारकडे मोठी मागणी केली आहे. यामुळे नाराजी पसरू शकते असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

गुणरत्न सदावर्ते संतापले, पहिल्यांदाच सरकारविरोधात घेतली मोठी भूमिका, थेट एका एका मंत्र्याचं नाव घेऊन...
gunratna sadawarteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 15, 2026 | 3:17 PM
Share

राज्य मंत्रिमंडळाने शासकीय नोकरभरतीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी वय, शैक्षिणक पात्रता किंवा परीक्षा शुल्कात सवलत घेतली आहे, अशा कोणत्याही उमेदवाराला आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाहीये, त्यांची निवड ही त्यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्यातूनच केली जाणार आहे. याचाच अर्थ जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराने कुठल्याही प्रकारची सवलत घेतली असेल आणि त्याला जर ओपन कॅटगिरीमधील विद्यार्थ्यापेक्षा जास्त मार्क असतील तरी देखील त्याची निवड ही आरक्षित जागांमधून होणार आहे, यापूर्वी त्याची निवड ही ओपनमधून केली जायची. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर आता समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते?

गुरुवारी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या स्वतःच्या धोरणाविरोधात जाऊन हा निर्णय झाला आहे. ओबीसी, भटके विमुक्त, एससी, एसटी, हा समाज एका गावातून दुसऱ्या गावात कामासाठी जातो, त्यामुळे त्यांची मुलं उशिरा शाळेत जातात. अधिकाऱ्यांनी सरकारची फसगत केली आहे. जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल हे मेरीट आहे. नव्या कायद्याने जी बंधन आणली गेली आहेत, त्याला कायदेशीर आधार नाही. कॅबिनेट नोटमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 1995 पासून ते 2000 पर्यंतच्या जेटमेंटचा उल्लेख नाही. शिपाई पासून ते कलेक्टर पर्यंत प्रत्येक नोकरीचा कायदा आहे, या सर्व नोकऱ्यांना एक विशिष्ट नियुक्ती निमय आहे, आणि त्यावर राज्यपालांची सही आहे, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जर या तरतुदी कायद्यात नसतील तर जीआर कसा आणला जाऊ शकतो? कायद्याच्या विरूद्ध जाऊन सरकार जीआर काढू शकत नाही, हे नाराजी पसरवणारे आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या ब्रिफिंगमुळे कॅबिनेटमध्ये चुकीचा निर्णय झाला. आम्ही सरकारच्या विरोधात नाही, जनरल मेरिटच्या विरोधात नाही. परंतु कायद्याच्या विरुद्ध कालचा निर्णय आहे. 14 मे रोजी निर्णय घेतला आहे पुढच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देऊ नये आणि पुनर्विचार करावा. शेकडो लोकांचे फोन येत आहेत, विद्यार्थी देखील फोन करत आहेत. ग्रुप तयार होत आहेत, त्यांच्या वतीने बोलण्यासाठी समोर आलो आहे. गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी झिरवाळ, पंकजा मुंडे , धनंजय मुंडे, संजय शिरसाट, गोपीचंद पडळकर यांना विनंती करत आहोत की या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे. सगळ्यांनी यावर बोलेले पाहिजे, लवकरच या संदर्भात मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार