Gunratan Sadavarte : ‘सरसकट जातीलाच त्या जातीत वर्ग…’, वकील गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
Gunratan Sadavarte : मनोज जरांगे यांच्या आंदोलनात अटी शर्थींचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी काल कोर्टात केला. संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्तारोको केला जातोय, यामुळे सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास होत आहे, असेही गुणरत्न सदावर्तेंनी कालं म्हटलं होतं.

“गॅजेटर हा त्या कागदपत्रासाठी एक पुरावा असू शकतो. त्या नोंदीच्या आधारे कोणी मागास ठरत नाही. ती केस वेगळी आहे. तशाप्रकारे देशातलं कोणतच राज्य तशा प्रकारची अधिसूचना काढू शकत नाही. सरसकट सगेसोयरे, जातीलाच त्या जातीत वर्ग करा असं होत नाही” असं वकील गुणरत्ने सदावर्ते म्हणाले. सुरुवातीपासून गुणरत्न सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या उपोषण आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आज मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यासाठी गुणरत्न सदावर्ते कोर्टाकडे निघाले आहेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधाला. कुठेतरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, पोलिसांनी कारवाई करावी अशी आपली मागणी आहे. त्यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “पोलिसांनी बेस्टच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस यंत्रणा कायदेशीर तत्परतेने काम करत आहे”
आझाद मैदानात नारळाच्या झाडावर चढणे, ही…
“ज्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यावेळी सानंदाच्या प्रकरणात राजकारण्यांची वाट न पाहता पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्या मताला विसंगत, पोलीस कायद्याला विसंगत, उपोषण आंदोलन कायद्याला विसंगतपणे कोणाला काही चुकीची कृती करता येणार नाही” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. “आझाद मैदानात नारळाच्या झाडावर चढणे, पालिकेच्या खांबावर चढणे ही हुल्लडबाजी आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते यांनी काल कोर्टात काय म्हटलं?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात अटी शर्थींचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी काल कोर्टात केला. संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्तारोको केला जातोय, यामुळे सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास होत आहे, असेही गुणरत्न सदावर्तेंनी कालं म्हटलं. या आंदोलनाला दिलेली परवानगी आणि अटींची कोर्टाकडून पडताळणी सुरु आहे. या आंदोलनासाठी कोणत्या अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली होती, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
