AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हगवणे कुटुंबीयांना मकोका लागणार का?; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान काय?

Vaishnavi Hagawane death case: वैष्णवी - शशांक यांच्या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी, काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? हगवणे कुटुंबीयांना मकोका लागणार का?

हगवणे कुटुंबीयांना मकोका लागणार का?; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान काय?
फाईल फोटो
| Updated on: May 23, 2025 | 11:03 AM
Share

वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि नणंद यांना अटक केली आहे. तर फरार असलले सासरे राजेंद्र आणि सुशील यांना आज अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी पोलीस करतील.’

छळ करून आत्महत्या करायला लावणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. या प्रकरणी जे करता येईल ते करू. मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत. नियमात बसलं तर मकोका लावू शकतो. पण मकोका लागेल की नाही हे आज सांगता येत नाही. त्यावर बोलू शकत नाही.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे वैष्णवी प्रकरणातील आरोपींवर मकोका लागेल की नाही अद्याप सांगता येत नाही.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘फार वाईट गोष्ट आहे. आज 21व्या शतकात जेव्हा मुली आणि सूनांमध्ये कोणताही फरक करणं चुकीचं आहे. अशा प्रकारची वागणूक देणं हे अतिशय पाप आहे. ते या ठिकाणी झालं आहे…’ सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री म्हणाले, ‘अजित पवार याप्रकरणी गंभीर नाही असं नाही. कोणत्याही कार्यकर्त्याकडे, समाजात लग्नाला बोलावलं तर आपण जातो. पुढे काय घडणार याची कल्पना आपल्याला नसते. एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला… आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. पुढेही उचित कारवाई करतील. आता या प्रकरणाला खूप फाटे फोडता कामा नये. असं देखील फडणवीस म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सर्व पुरावे घेत आहोत. दोषारोप करणार आहोत. लॉजिकल एंडला प्रकरण नेणार आहे. वरिष्ठांकडून तशा सूचना आल्या आहेत. त्यामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.