AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोरोना’ रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर-कर्मचारी युद्धातील आघाडीचे सैनिक, राजेश टोपेंकडून पत्राद्वारे आभार

तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील 39 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे (Rajesh Tope Salutes Doctor Nurses Fighting against Corona)

'कोरोना' रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर-कर्मचारी युद्धातील आघाडीचे सैनिक, राजेश टोपेंकडून पत्राद्वारे आभार
| Updated on: Apr 01, 2020 | 3:52 PM
Share

मुंबई : ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची सेवा करणारे राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘कोरोना’शी लढणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी ‘युद्धातील आघाडीवरचे सैनिक’ अशी उपमा दिली. जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखवताना न थकता हे काम सुरु ठेवल्याबद्दल राजेश टोपेंनी सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. (Rajesh Tope Salutes Doctor Nurses Fighting against Corona)

‘कोरोनाचे जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहात. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील 39 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार!’ असं आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून आरोग्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

कोरोनाचा शिरकाव सुरु झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय असल्याचंही टोपे म्हणाले. (Rajesh Tope Salutes Doctor Nurses Fighting against Corona)

हेही वाचा : स्वत:ची आई ICU मध्ये, मात्र लेकाची महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धडपड, राजेश टोपेंना सलाम

‘तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासी आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.’ असंही राजेश टोपे यांनी पुढे म्हटलं आहे.

मी आपणा सर्वांना पुन्हा त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरवण्यासाठी आपली लढाई अशीच सुरु ठेवूया. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरुर पोहोचवा, असे आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात केलं आहे.

(Rajesh Tope Salutes Doctor Nurses Fighting against Corona)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.