आता वेळ उलटी फिरतेय? परबांचा दावा, सोमय्यांना हायकोर्टाचे समन्स

अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

आता वेळ उलटी फिरतेय? परबांचा दावा, सोमय्यांना हायकोर्टाचे समन्स
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 6:38 PM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे आवाहन

खरं तर सोमय्यांविरोधात दावा दाखल करत असल्याची माहिती अनिल परबांनी ट्विट करत दिली होती. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

आधी नोटीस, आता दावा

अनिल परब यांनी 14 सप्टेंबर रोजी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

सोमय्या काय म्हणाले?

परब यांनी नोटीस पाठवल्यानंतर सोमय्या यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असं वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी दिला होता. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असं सोमय्या म्हणाले. दरम्यान, विदर्भातील काँग्रेस मंत्र्यांपैकी सोमय्या यांचा रोख कुणाकडे आहे? असा सवाल आता विचारला जातोय. विदर्भात काँग्रेसचे सुनिल केदार, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी परिवारातील आता कोणता मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहे, हे पाहणही महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनी मटेरियल पुरवलं का? किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Defamation Case : शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार, मीडिया प्लॅटफॉर्मचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचे आदेश

High Court summons to kirit Somaiya on anil parab file 100 crore defamation suit

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.