AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: फुटीने आकडे बदलतात, निष्ठा नाही! उद्धव ठाकरेंचा झंझावाती दौरा… ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार

Uddhav Thackeray at Parbhani and Dharashiv: बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा सुरू आहे. काल वाशिम-यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे संजय देशमुखांवर कडाडले. फुटीने आकडे बदलतात, निष्ठा नाही, ही टॅगलाईन एकदम चर्चेत आली. आज संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात त्यांची तोफ धडाडणार आहे.

Uddhav Thackeray: फुटीने आकडे बदलतात, निष्ठा नाही! उद्धव ठाकरेंचा झंझावाती दौरा... ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार
उद्धव ठाकरे, शिवसेना मराठवाडा दौराImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 28, 2026 | 9:11 AM
Share

Uddhav Thackeray at Parbhani and Dharashiv: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 6 बंडखोरांनी एकनाथ शिंदे यांचा खेमा जवळ केला. सेनेत पुन्हा एकदा फुटीचे बीज रुजले आणि पक्ष फुटला. त्यानंतर उद्धव सेनेने लागलीच फवारणी हाती घेतली. पक्षाची डागडुजीला सुरुवात केली. पक्ष बांधणीसोबतच बंडखोरांचा समाचार हाती घेतला. काल वाशिम-यवतमाळ मतदारसंघात खासदार संजय देशमुख यांच्याविरोधात उद्धव ठाकरे कडाडले. आईची शपथ घेऊन त्यांनी गद्दारी केली असा पलटवार केला. तर कालच्या सभेनंतर फुटीने आकडे बदलतात, निष्ठा नाही, ही टॅगलाईन व्हायरल झाली. आज उद्धव ठाकरे यांचा दौरा मराठवाड्यात धडकणार आहे. खासदार संजय जाधव यांचा परभणी मतदारसंघ, खासदार नागेश आष्टीकर पाटील यांचा हिंगोली मतदारसंघ आणि एक जिल्हा सोडून तळ मराठवाड्यातील खासदार ओमराजे निंबाळकरांचा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा दिसेल. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जात. आज त्यांच्याविरोधात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

दुसर्‍या संजयच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे

काल वाशिम-यवतमाळ मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा गाजली. त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्याविरोधात तुफान बॅटिंग केली. त्यांची एक क्लिप दाखवली आणि खासदारांना हमीभाव मिळाल्याचा आरोप केला. तर आज खासदार संजय जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उद्धव ठाकरे परभणीत दाखल झाले आहेत. संजय जाधव यांनी अगोदरच पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. तेही उद्धव सेनेचे जुन्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी शिंदे सेना जवळ केली. आज सकाळी 10 वाजता अक्षदा मंगल कार्यालयात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील अनेक नेते उपस्थित असतील. संजय जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे काय टीका करतात. खासदार नागेश आष्टीकर पाटील यांच्याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव मध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा, पक्षांतरानंतरच्या पहिल्याच सभेकडे राज्याचं लक्ष

पक्षांतर केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत आहेत. अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 3 वाजता शहरातील सिताई मंगल कार्यालयात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेत ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावर काय भूमिका मांडतात, कोणते आरोप करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने या सभेद्वारे मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे उद्धव ठाकरे सभेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!