संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं…

ब्रह्मतेच्या पातकाला प्रायचीत्त नव्हतं. त्यामुळे संभाजीराजे ब्राह्मणाला हत्तीच्या पायी देतात याची सल त्यांना कायम होती. ही सल आजही वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर काढली जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं...
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 4:32 PM

कोल्हापूरः मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. आणि त्यामुळे आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य वरून राज्यात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी मी गजानन मेंहदळे यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात ते सात होते की आठ होते याचा उल्लेख नाही.

इतिहासातील कोणत्याही पानावर प्रतापरव गुजरांबरोबर कोण लोक होते याचा उल्लेख आलेला नाही, आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सगळी काल्पनिक आहेत असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणासह अनेक इतिहास अभ्यासक आणि संशोधकांनी यावर आक्षेप घेतले.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी याविषयी बोलताना सांगितले की, प्रतापराव गुजर आणि बेहलोल खानामध्ये दोन मोठी युद्ध झाली होती.

उमराणीच्या युद्धात प्रतापरावांनी बेहलोल खानाला धर्मवाट दिली असल्याचा इतिहास इंद्रजित सावंत यांनीच सांगितला. प्रतापराव गुजर आणि बेहलोल खान यांच्यातील झालेला बहलोल खाना आणि प्रतापरावांबरोबर झालेला तह त्यांनी मोडला होता असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी याविषयी बोलताना आणि इतिहासाचे दाखले देताना सांगितले की, इतिहासाचा अभ्यास कुठल्या एका साधनांवर होत नाही.

तर अनेक साधनं जमा करून त्यातून अन्वयार्थ काढावा लागतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे इतिहासातील पुराव्याच्या आधारावरच नेसरीच्या युद्धाचे पुरावे इतिहासात 100 टक्के असल्याचा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे.

इतिहासातील इंग्रजांच्या दुभाष नारायण सिनवी यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, नारायण सिनवी हे इंग्रजांचे दुभाष होते.

त्यांनीही प्रतापराव आणि त्यांच्या सोबतच्या सहा सरदाराचा उल्लेख इतिहासात केला आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यामुळे इतिहासामध्ये प्रतापराव गुजर यांच्याबाबतचा इतिहासात काही उल्लेख सापडत नाही असं म्हणत असतील तर नंतरही कोणी हे युद्ध झालं नाही असं म्हणत असेल तर हे चुकीचं आहे असं स्पष्ट मतही त्यांनी यावेली व्यक्त केले.

यावेळी इंद्रजित सावंत यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी चाललेल्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयीही आपली भूमिका मांडली.

यावेळी इंद्रजित सावंत यांनी सांगितले की औरंगजेबाला शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची रणनीती समजली होती. संभाजीराजे मोगलाईत फितुरी करण्यासाठी गेले होते. तसं नसतं तर शिवाजी महाराजांसारखा कर्तव्यात कठोर असणाऱ्या राजानं संभाजीराजांना त्यांनी माफ केलच नसतं.

यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्याविषयी माहिती देताना म्हणाले की, शंभूराजे हे संस्कृतचे तज्ज्ञ होते. त्याचबरोबर अण्णाजी दत्तो आणि त्याच्या गटातील लोक संभाजी राजेंचा द्वेष करत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजांचा हक्क यांनीच डावलला होता.त्याचमुळे ही मंडळी संभाजीराजांच्या जीवावर उठली होती असं सांगत त्यांनी इतिहासातील एक बाजू सांगितली.

ब्रह्मतेच्या पातकाला प्रायचीत्त नव्हतं. त्यामुळे संभाजीराजे ब्राह्मणाला हत्तीच्या पायी देतात याची सल त्यांना कायम होती. ही सल आजही वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर काढली जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

त्यावेळेपासून संभाजी राजेंच्या बदनामीची केंद्र महाराष्ट्रात फिरत आहे. त्यामुळेच सगळे नाटककार चित्रपटकारांनी संभाजी महाराजांची बदनामी करण्याचे सुपारी घेऊनच हे काम केलं असल्याची टीका त्यांनी नाटककार आणि चित्रपटकारांवर केली आहे. यामुळेच पराक्रमी संभाजीराजेंचे चरित्र बदनामीच्या गर्तेत सापडलं होते असंही त्यांनी म्हटले आहे.

तर ‘हर हर महादेव’ चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, बाजीप्रभू देशपांडे हे बादलांचे सरनोबत होते. आणि बांदल हे शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते.

जर बांधलचं शिवाजी महाराजांच्या बरोबर पहिल्यापासून असतील तर त्यांचा सेवक असलेले बाजीप्रभू शिवाजी महाराजांच्या विरोधात कसे जातील असा सवालह त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच इतिहासात अशा लढाईचा कोणताही उल्लेख नाही. यांच्या तलवारी एकमेकाला भिडल्या आहेत असा किंचितही पुरावा इतिहासात नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.