देशाचा केंद्रबिंदू , झिरो माईल सिटी ते भोसलेंची राजधानी, नागपूरची स्पेशल स्टोरी

सचिन पाटील

|

Updated on: Jan 09, 2021 | 1:21 PM

History of orange city  Nagpur : नागपूर शहराची प्राचीन शहर म्हणून ओळख आहे. या शहराचा नेमका इतिहास काय? संत्र्यांशिवाय नागपूर का फेमस आहे? पर्यटनस्थळे कोणती?

देशाचा केंद्रबिंदू , झिरो माईल सिटी ते भोसलेंची राजधानी, नागपूरची स्पेशल स्टोरी
झिरो माईल

Follow us on

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानीचं शहर असलेल्या नागपूर शहराचा (History of orange city  Nagpur) अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. नागपुरात गोंड राजापासून ते भोसले राजांनी राज्य केलं. देशाचं झिरो माईल , संत्रानगरी , मिडल ऑफ कंट्री अशा वेगवेगळ्या नावानी या शहराची ओळख आहे. मात्र या शहराचा प्राचीन इतिहास काय आहे बघूया – (History of orange city  Nagpur Location, History, Economy, zero mile, & Facts)

नागपूर हे अतिप्राचीन शहर आहे. या शहरांचं उल्लेख 10 व्या शतकात मिळालेल्या ताम्रपटात आढळून आला आहे. या शहराची निर्मिती छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडच्या गोंड राज्याने 1702 साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. नाग नदीच्या तीरावर असल्याने शहराला नागपूर हे नाव देण्यात आलं.

देवगड राज्यात त्याकाळी नागपूर, सिवनी , बैतुल , बालाघाट आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने 1706 साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ 33 वर्षे राज्य करुन नागपूर शहर भरभराटीस आणले. राजा चांद सुलतान याच्या मृत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले. इ स 1742 मध्ये रघुजी राजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ .स 1817 मध्ये सीताबर्डीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ . स 1861 मध्ये नागपूर ही सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरारची राजधानी झाली.

नागपूर – महाराष्ट्राची उपराजधानी

या शहराची स्थापना गोंड राजाने केली असली, तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले. ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स अँड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली. पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले.

Nagpur City

Nagpur City

कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले. काहींच्या मते, जुन्या नागपूरमधून नागनदी वाहात असल्याने या शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले आहे आणि देशातील विविध शहरे, तालुका आणि गावांच्या नावापुढे ज्या प्रकारे पूर हे विशेषण देण्यात आले आहे, त्याचप्रकारे नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले. याच अनुषंगाने नागपूर महानगर पालिकेच्या सिम्बॉलवर नाग दाखविण्यात आला आहे.

ब्रिटीशांचा विजय

1803 मध्ये राघोजी (द्वितीय) दुसऱ्या अँग्लो —मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, या युद्धात ब्रिटीशांचा विजय झाला. 1816 मध्ये राघोजी (द्वितीय) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा पारसाजी याला मुधोजी (द्वितीय) याने हद्दपार केले आणि त्यांची हत्या केली. 1817 मधील मुधोजी तिस-या अँग्लो — मराठा युद्धाच्या काळाच्या काळात मुधोजी इंग्रजांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, सध्या नागपूर शहरात असलेल्या सीताबर्डी येथील युद्धात त्यांचा पराभव झाला. हे युद्ध भोसल्यांच्या साम्राज्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. या युद्धानंतर भोसल्यांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि ब्रिटीशांनी नागपूर शहर काबिज केले.

तात्पुरत्या ताजपोशीनंतर मुधोजींना हद्दपार करण्यात आले आणि ब्रिटीशांनी राघोजींचे (द्वितीय) नातू राघोजी (तृतीय) यांच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला. १८४० पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्तेच्या काळात या प्रांताची प्रशासकीय सूत्रे इंग्रज रेसिडेंटच्या हातात होती. राघोजी (तृतीय) यांच्या निधनानंतर १८५३ मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली. इ स १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला. त्याच एम्प्रेस आणि मॉडेल मिल होत. स्वातंत्र्य युद्धात देखील या शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली. असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले.

Nagpur City

Nagpur City

भारताची व्याघ्र राजधानी

या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते. पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते. झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.

RSS

RSS

संघभूमी ते दीक्षाभूमी

१९२५ साली डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर इथे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस )’ ची स्थापना केली. तर १९५६ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हा पासून नागपूरच्या दीक्षाभूमीला मोठं महत्व असून या ठिकाणी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी इथे देशविदेशातून येतात. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस आणि बेरार भारतातील एक प्रांत बनला. १९५० मध्ये मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली आणि वऱ्हाड (विदर्भ ) नव्या राज्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता, मात्र त्याला यश मिळालं नाही. आज नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं अधिवेशनही इथे भरते.

Nagpur City

दीक्षा भूमी

नागपूरचा इतिहास आणि संस्कृती –

कालिदास महोत्सव :

नोव्हेंबर महिन्यात महिनाभरात रामटेक आणि नागपूरमध्ये कालिदास महोत्सव साजरा केला जातो. एमटीडीसीद्वारे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, कालिदास सन्मान करण्यासाठी हा संगीत, नृत्य आणि नाट्य महोत्सव आहे. कालिदास भारतातील एक महान संस्कृत कवी आणि नाटककार होते, आपल्या ऐतिहासिक नाटक शकुंतलाम्, कुमारसम्भवा, ऋतुसमर्थ आणि मेघदूत इरिया मेघदूतम या महाकाव्य कवितेसाठी प्रसिद्ध. असे म्हटले जाते की सुरचित रामटेकने कालिदास यांना प्रसिद्ध साहित्यिक काम, मेघदूतम् लिहिण्याची प्रेरणा दिली आहे.

कस्तुरचंद पार्क :

नागपूर शहरातील सर्वात मोठया भेटीची ठिकाणे म्हणजे कॅस्टचंड पार्क. हे 1 किमी वर स्थित आहे. मध्य रेल्वे स्टेशनपासून शहरातील मोठ्या प्रमाणात मिरवणारा हाती घेताना हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. खरेतर, येथे उपलब्ध असलेल्या जागेमुळे बरीच व्यापार शो आणि मेळावे देखील आयोजित केले जातात. उद्यान संपूर्ण वर्षभर सर्व प्रकारचे उपक्रम सहसाहाय्य करत आहे.

नगरधन किल्ला, रामटेक :

नागरधन, ३८ कि.मी. नागपूर पूर्वोत्तर आणि रामटेकच्या दक्षिणेस 9 किमी अंतरावर स्थित आहे. हे सूर्यवंशी राजा यांनी स्थापित केलेले जुने शहर आहे. नगरधनचे मुख्य आकर्षण आहे नागधाधन किल्ला, राजा रघुजी भोंसले यांनी बांधले जाऊ नये, भोसले राजघराण्याचा एक मराठा राजा. किल्ल्यातील चौरस आकाराचे राजवाडा बालेकिल्ल्यांसह बाह्य घराबाहेर आहे आणि इमारती भोवतालची आतील भिंती होती. उत्तर-पश्चिम बाजूला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या आत, राजवाड्यात जवळच एक विहीर आहे, ज्यामध्ये लोकांना योग्य खोल्यांसह राहण्यासाठी दोन पातळी आहेत. त्यामध्ये देवी दुर्गाची एक मूर्ती आहे.

सीताबर्डी किल्ला:

नागपूरच्या सीताबाली किल्ल्यात सीताबाली किल्ला, सीताबर्डीच्या १८१७ मधील लढाईची जागा, नागपूरच्या मध्यभागी एक लहान टेकडीच्या वरती आहे. तृतीय इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढण्याआधी, नागपूरच्या राजापूराने अप्पा साहिब किंवा मुधोजी द्वितीय भोसले यांनी बांधला होता. टेकडीच्या परिसरात आता सिताबळी म्हणून ओळखले जाते आणि नागपूरसाठी एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. किल्ल्याच्या आत अनेक ब्रिटीश सैन्याचे कवचे आणि महात्मा गांधी यांना कारागृहात ठेवलेले एक सेल सापडले. सध्या, सीताबर्डी किल्ला प्रादेशिक सैन्याचे कार्यालय आहे. किल्ला सामान्य नागरिकांना केवळ दोन राष्ट्रीय सुट्ट्या-26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी उघडते.

nagpur zero mile piller

झिरो माईल

झिरो माईल :

नागपूरमधील झीरो माईल ही भारताच्या मध्यभागी आहे. झिरो माईल मार्कर भारताचे भौगोलिक केंद्र दर्शवित आहे. ब्रिटीशांनी झिरो माईल स्टोनची स्थापना केली होती. ज्याने या ठिकाणाचा वापर सर्व अंतर मोजण्यासाठी केला. झीरो माईल स्टोनमध्ये चार घोडे आणि एक वाळूचा खडक असलेला खांब आहे. हे नागपूरच्या विधानभवनच्या जवळ आहे

मारबत महोत्सव:

नागपूर शहरातील मारबत महोत्सव हा या भागाचा एक महत्वाचा सण आहे जो शहराच्या आत्यंतिक श्वापदापासून संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात नागपूरचे लोक त्यांच्या देवदूतांना भुतेपासून वाचविण्यासाठी आग्रही असतात आणि ते वाईट शक्तींचे पुतळे बनवतात. शहराच्या सर्व भागांमधून या पुतळ्याला मिरवणूक म्हणून मोठ्या ग्राऊंडवर नेले जाते. ते सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून मुक्त असतील ह्या विश्वासावर एकत्र जाळले जाते. लोक त्या दिवशी नवीन पोशाख आणि दागिने खरेदी करतात. स्त्रिया स्वादिष्ट तयार करतात आणि सर्वांना वाटप करतात. उत्सवा दरम्यान नृत्य, नाटक इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

नागपूर शहर आता आधुनिकतेकडे वळले असून देशातील महत्वाच्या शहरात नागपूरचा समावेश आहे. औद्योगिकदृष्ट्या शहर वाढत असून शहराची व्याप्ती सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच्या चारही दिशांना हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि रस्त्यांनी जोडणारे हे शहर असल्याने या शहराचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI