AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा नवा विषाणू किती खतरनाक? भारतात पुन्हा कोव्हिडची लाट येणार? आरोग्य तज्ज्ञांचं मोठं भाकीत

अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता भारतात देखील चिंता वाढली आहे, जाणून घेऊयात नवा विषाणू किती धोकादायक असू शकतो.

कोरोनाचा नवा विषाणू किती खतरनाक? भारतात पुन्हा कोव्हिडची लाट येणार? आरोग्य तज्ज्ञांचं मोठं भाकीत
Follow us
| Updated on: May 19, 2025 | 7:46 PM

चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे जग लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलं होतं. या काळात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली, आजही कोरोना काळातील कटू आठवणी ताज्या आहेत. 2020 मध्ये आलेली कोरोनाची लाट  2022 मध्ये अटोक्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे काही देशांमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णात वाढ झाली आहे, त्यामुळे भारतात देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारतामध्ये पुन्हा कोरनाची लाट येणार का? आली तर कोरोनाचा हा नवा विषाणू किती खतरनाक असू शकतो. यामुळे किती नुकसान होऊ शकते, रुग्णाला काय त्रास होऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तर आरोग्य तज्त्र अविनाश भोंडवे यांनी दिली आहे, जाणून घेऊयात.

नेमकं काय म्हटलं अविनाश भोंडवे यांनी? 

सिंगापूरमध्ये कोरोनाचे नव्याने रुग्ण आढळल्यामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नाही,  2020 मध्ये सुरू झालेली कोरोनाची लाट 2022 मध्ये आटोक्यात आली. त्यावेळी कोरोनाचा विषाणू नष्ट झालेला नव्हता. त्यामुळे तो काही भागात डोकं वर काढेल असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते.

मात्र भारताबाबत बोलायचं झाल्यास, काळजी करण्याचं काही कारण नाही.  हा विषाणू  भारतामध्ये सर्व पातळीवर पसरणार नाही. आता कोरोनाचे जे नवे व्हेरियंट येत आहेत. ते फारसे मारक नाहीत.  गेल्या चार वर्षात कोरोना संपला असं जाहीर झाल्यानंतर देखील भारतात एखादा दुसरा रुग्ण सापडत होता, आपल्या देशात कोरोनाचा थोड्या-फार प्रमाणात शिरकाव होऊ शकतो, मात्र लाट येईल असं काही वाटत नाही. हा विषाणू संशोधकांना प्राण्यांमध्ये देखील सापडला आहे,  कोरोनाचा विषाणू नवा असो किंवा जुना उपाय तेच आहेत, तो पुन्हा येऊ शकतो, पण घाबरू जाऊ नका काळजी घ्या असं भोंडवे यांनी म्हटलं आहे.

..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....