AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला रात्रीची झोप येत नाही, कारण अनेक कामे… सरकारच्या वर्षपूर्तीवर बोलताना देवेंद्र फडणवीस भावूक

मी राडा मी होऊ देणारा नाही. परंतू प्रत्येकालाच युनियन काढण्याच्या हक्क आहे. कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असे वरळीतील एका हॉटेलात भाजपा आणि ठाकरे सेनेत झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मला रात्रीची झोप येत नाही, कारण अनेक कामे... सरकारच्या वर्षपूर्तीवर बोलताना देवेंद्र फडणवीस भावूक
CM Devendra Fadnavis
| Updated on: Dec 05, 2025 | 5:34 PM
Share

महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे धन्यवाद आणि त्यांना नमन. एका वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारले. हे वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करत मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्थ करतो, असाच महाराष्ट्र पुढे जात राहील. पुढे जात राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल बोलताना म्हटले आहे.  2015-16 च्या दुष्काळात आपण स्वप्न पाहिले की आपण जो दुष्काळ पाहिला तो दुष्काळ येणाऱ्या पिढीने पाहू नये. त्यामुळे पुढील काळात मराठवाडा दुष्काळमुक्त झालेला दिसेल. सध्याच्या धोरणाचा पुढील चार वर्षात मोठा परिणाम शेती क्षेत्रात पाहायला मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यंदाच्या अतिवृष्टी आणि पुराने शेतकरी अडचणी आला, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. 32  हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले.शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे पोहचवण्याचे काम केले.शेतकऱ्यांचा फायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही असेच कार्य करत राहू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लागले

मी 2014 ला राज्याचा मुख्यमंत्री झालो. दोन वर्षे प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागला.एकीकडे पाण्याची आणि एकीकडे विजेची अडचण दिसली. शेतकऱ्यांना कधी दिवसा तर कधी रात्री वीज नसल्याची तक्रार होती. शेतकरी म्हणाले आम्हाला 12 तास वीज द्या.मराठवाड्याची पाणीपातळी वाढली असे समितीला समजले आहे. रात्रीची वीज नसल्याने साप,जनावर यांची अडचण असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी होत्या.आता वीजेच्या बाबतीत राज्य समृद्ध आहे. महाराष्ट्राची योजना ही इतर राज्यात ही लागू करा असे पत्र काढले आहे. देशात कुसुमअंतर्गत साडे नऊ लाख पंप लागले तर सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लागले आहेत अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

पुढील वर्षी 10 लाख पंप झाले पाहिजे

शेतकरी आधी बिल भरायचे नाहीत.आता 365  दिवस वीज आणि तीन पिके घेण्याची संधी. इको सिस्टममुळे ही क्षमता निर्माण झाली.पेड पेडिंग संपले असून येणारी डिमांड संपवू शकत नव्हतो. मात्र दरवर्षी 20  हजार पंप लावणारा महाराष्ट्राने आता एका महिन्यात 45,991  पंप बसवून विश्वविक्रम केला आहे. डिमांड केल्यापासून एका महिन्यात पंप लागले. मागेल त्याला सौर पंप देऊन विश्वविक्रम बनवला.आम्हीच आमचा रेकॉर्ड ब्रेक करून दाखवू. आम्ही आता साडे सात लाखापर्यंत गेलो. पुढील वर्षी 10 लाख पंप झाले पाहिजे. महाराष्ट्र असे पहिले राज्य होत आहे जे शेतकऱ्यासाठी वेगळी वीज कंपनी बनवत असून शेतकऱ्यांना सौर वीज दिली जाणार आहे. कुठलेही प्रदूषण न करता अन्न आणि शेती करणारे आपले शेतकरी बनणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

नवा विश्वविक्रम केला

पाच वर्षे वीज बिल घेणार नाही असे आधी शेतकरी म्हणत होते. मग आम्ही म्हणालो मात्र पुढे काय ? त्यामुळे सौर पंप असेल तर 25  वर्षे वीज बिल येणार नाही. यामुळे पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. वीजेचे भाव दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत. 3 % ने कमी करत आहोत. हा फक्त विश्व विक्रम नसून संपूर्ण देशासाठी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी हा नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

रात्री झोप का येत नाही ?

आपल्याला रात्री झोप यासाठी येत नाही, कारण मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टी आपल्याला महाराष्ट्रासाठी करायच्या आहेत असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार श्वेतपत्रिका काढावी असे म्हटले आहे, त्यावर बोलताना त्यांच्या सगळ्याच्या मनात खदखद असते की आपण का एवढं महाराष्ट्रासाठी करू शकलो नाही अशी त्यांची भावना असते. आज त्यांच्यावर फार काही टीका आपण करणार नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांना स्वप्नं पडतात

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी पाय उतार होतील आणि मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे असा दावा केला आहे यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबांना अशी स्वप्नं पडत असतात. पीएम देशासाठी खूप चांगलं काम करत आहेत आणि 2029 ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.