AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर…, भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंची मोठी मागणी, थेट दिला इशारा

राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात मोठी मागणी केली आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना अंजली दमानिया यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर..., भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंची मोठी मागणी, थेट दिला इशारा
sushma andhareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 06, 2026 | 5:19 PM
Share

सध्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल्स झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता अंजली दमानिया यांच्याकडे अशोक खरात याचा सीडीआर कसा आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी मागणी केली आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना अंजली दमानिया यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.  या प्रकरणात एसआयटीच्या तपासाला वेग येत नसेल तर सीआयडीकडून चौकशी करावी अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अंधारे? 

कोणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या. असं जर खरच झालं असेल तर ही लोक कोण आहेत? या मागे कोणाचा हात आहे? अशोक खरात याच्या मार्फत हे कोण करत आहे , याची माहिती घेतली पाहिजे.  एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर या प्रकरणात सीआयडीची नियुक्ती करावी अशी आमची मागणी आहे, असं यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच आर्थिक स्त्रोत का तपासले जात नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  सीडीआर बाहेरचा माणूस काढतो, मग एसआयटीला का काढता येत नाहीत? या प्रकरणात वेगवान पाऊले उचलली गेली पाहिजेत. नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतील, कारण हा लेकीबाळीचा प्रश्न आहे, असा इशाराही यावेळी सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला आहे.  सगळ्या मुद्द्यांचे निरासरण झाले पाहजे, दीपक केसरकर यांनी फोन केले की नाही हे पाहिले पाहिजे, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, असंही यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?