AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी

पुन्हा एकदा एक मोठं संकट निर्माण झालं आहे, भारतीय हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राबाबत देखील मोठी बातमी आता समोर आली आहे.

IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी
मुसळधार पावसाचा इशारा Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 2:58 PM
Share

या वर्षी देशासह राज्यात पावसानं धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं. यंदा देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका हा अनेक राज्यांना बसला. पावसामुळे मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रालाही यावर्षी मान्सूनचा चांगलाच तडाखा बसला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला. नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागामध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी घरं वाहून गेल्यानं अनेकांचा संसार उघड्यावर आला तसेच पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. दरम्यान आता अनेक राज्यांमध्ये हळुहळु थंडीचा कडाका वाढू लागला आहे, मात्र थंडीचा कडाका वाढत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये आयएमडीकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. डिटवाह चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळसोबतच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुचेरी आणि अंदमान व निकोबार या बेटांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

श्रीलंकेत डिटवाहाचा हाहाकार

श्रीलंकेला डिटवाह चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे, या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामुळे देशात शेकडो जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत, त्यांचा आता शोध घेतला जात आहे, त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे श्रीलंकेत प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान आता हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकरलं आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये भारतात हवेचा वेग प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, प्रति तास 90 किमी वेगाने वारे वाहन्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

या चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रावर देखील होणार आहे, राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र ठंडीचा कडाका वाढणार आह, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...