IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, महाराष्ट्राबद्दल मोठी बातमी
मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयएमडीकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, पावसानं अनेक राज्यांना झोडपून काढलं, या पावसाचा महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला. महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला, या नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठं नुकसान झालं. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. शेतीचंही मोठं नुकसान झालं. ऐन हातातोंशी आलेला घास निसर्गानं असा हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले, दरम्यान पावसाचं संकट आता टळलं आहे, असं वाटत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर आयएमडी (IMD) कडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी देखील मोठी बातमी आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज
दक्षिण भारत आणि आसपासच्या समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळुहळु वातावरण धोकादायक स्थितीमध्ये पोहचत आहे. पुढील 24 तासांमध्ये एक सायक्लॉनिक सर्कुलेशन देखील तयार होत आहे, त्यामुळे देशातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, सध्या वातावरणामध्ये जो बदल झाला आहे, त्यामुळे 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडूच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडूसोबतच आंध्र प्रदेशचा किनारी भाग, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटावर देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र उत्तर आणि मध्य भारतात थंडीचा कडाका वाढणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, थंडीच्या लाटेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र चांगलाच गारठणार आहे, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
