देशासह राज्यावर संकट! 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला मोठा इशारा, थेट अलर्ट जारी, पुढील 24 तास…
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. देशातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. काही भागात पाऊस तर काही भागात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी उष्णता जाणवत आहे. सकाळी गारठा असतो तर दुपारी उष्णता अधिक वाढते. नुकताच भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेसह पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तासात देशातील अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमध्ये पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. राज्यात देखील मोठा अलर्ट प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. थंडीच्या लाटेचा मोठा इशारा राज्यात देण्यात आला असून थंडीची लाट येणार असून थंडीचा कडाका अजून वाढणार आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढला
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने पूर्ण राज्यात गारठा वाढला. निफाड तालुका अक्षरशः गारठला आहे. निफाडमध्ये किमान तापमान 8 अंशांवर पोहोचले. तालुक्यातील गोंदेगाव व परिसरात सकाळ-संध्याकाळ तीव्र गारठा जाणवतोय. नागरिक शेकोटीचा आधार घेत ऊब मिळवतानाचे चित्र सध्या बघायला मिळतंय. थंडी वाढल्याने शेकोट्या शहरात अधिक बघायला मिळत आहेत.
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा घसरला
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात 3 ते 8 अंशांची मोठी घट झाली. थंडीचा कडाका वाढताना दिसत असन तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली जाताना दिसतोय. 6.2 निचांकी तापमानाची राज्यात नोंद झाली. आहिल्यानगर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा, अमरातवी, नागपूर, वाशिम, गोदिंया येथील पारा 11अंशांपेक्षाही खाली गेला.
भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा
18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळ, विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका असणार आहे. उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास अत्यंत धोकादायक आहेत.
